
अमरावती, 08 फेब्रुवारी (हिं.स.)तेलंगणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ स्टार प्रचारक नवनीत रवि राणा यांच्या आज आणि उद्याला विविध ठिकाणी जाहीर सभा व रोड शोड आयोजित करण्यात आले आहेत.भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे भाजपा नेत्या व स्टार प्रचारक नवनीत राणा यांचा तेलंगाणा निवडणुकीचा आज ८ व ९ फेब्रुवारी असा दोन दिवसीय दौरा नियोजित आहे. तेलगांणा भाजपा प्रदेश अध्यक्ष एन. रामाचंद्र राव, भाजपा प्रदेश उपाध्यक्षा कोळी माधवी, तेलंगणा प्रभारी आ. आशिष शेलार, प्रदेश सचिव डॉ. एन. गौतम राव यांच्याव्दारे या संपूर्ण दौर्याचे नियोजन झालेले आहे. या दौर्याअंतर्गत तेलंगणातील निर्मल जिल्ह्यातील भाईंसा व खानापूर, नारायणपेठ जिल्ह्यातील नारायणपेठ, मक्तल, रामागुंडम व निजामाबाद या महत्त्वाच्या ठिकाणी रोड शो तसेच जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या रोड शो मध्ये भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून संपूर्ण परिसर भाजपामय होण्याची शक्यता आहे. जाहीर सभेदरम्यान हिंदू शेरनी नवनीत राणा या केंद्र सरकारच्या तसेच भाजपाच्या विकासात्मक धोरणांचा आढावा घेत, तेलंगणाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करणार आहेत.
स्टार प्रचारक नवनीत राणा यांच्या उपस्थितीमुळे भाजपाच्या प्रचाराला मोठे बळ मिळणार असून, भाईंसा, खानापूर, नारायणपेठ, मक्तल, रामागुंडम व निजामाबाद या परिसरातील राजकीय वातावरण तापणार असल्याचे चित्र आहे. या रोड शो व सभेमुळे तेलंगणा स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाला निश्चितच सकारात्मक लाभ होईल, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी