भविष्याबाबत कार्यकर्त्यांना अपेक्षित निर्णय घेणार : दीपकआबा साळुंखे-पाटील
सोलापूर, 10 मार्च (हिं.स.)। नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांत आपण कमी पडलो. मात्र पराभवाचे शल्य बाजूला ठेवून झालेल्या चुका टाळत आगामी ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आ
भविष्याबाबत कार्यकर्त्यांना अपेक्षित निर्णय घेणार : दीपकआबा साळुंखे-पाटील


सोलापूर, 10 मार्च (हिं.स.)।

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांत आपण कमी पडलो. मात्र पराभवाचे शल्य बाजूला ठेवून झालेल्या चुका टाळत आगामी ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी केले. कार्यकर्त्यांच्या अपेक्षेनुसार लवकरच योग्य निर्णय घेऊ, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

सांगोला येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस ज्येष्ठ नेते तानाजी पाटील, शिवाजी बनकर, मधुकर बनसोडे, विजय येलपले, चंद्रकांत चौगुले, तुकाराम जाधव, विजय पवार, माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, सुनील पाटील, ॲड. यशराजे साळुंखे-पाटील, डॉ. पियुष साळुंखे-पाटील, समीर पाटील यांच्यासह तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी साळुंखे-पाटील म्हणाले, तालुक्यातील कार्यकर्त्यांनी नेहमीच आमच्यावर कुटुंबातील सदस्याप्रमाणे विश्वास ठेवला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवार कमी पडले असले तरी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा विश्वास आजही साळुंखे-पाटील परिवारावर आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे.बैठकीत मनोज उकळे, लहू कांबळे, अमर लोखंडे, विजय शिंदे, संतोष पाटील, विलास घुले, संभाजी हरिहर, अजित देवकते, सखूबाई वाघमारे, नारायण माळी, अजिंक्य शिंदे, दीपक कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande