सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
पुणे, 10 मार्च (हिं.स.)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्त्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास स्मृतिदिनानिमित्त कुलगुरू प्रा.(डॉ) सुरेश गोसावी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विद्
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन


पुणे, 10 मार्च (हिं.स.)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्त्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास स्मृतिदिनानिमित्त कुलगुरू प्रा.(डॉ) सुरेश गोसावी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास प्र-कुलगुरू प्रा.(डॉ) पराग काळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, बागेश्री मंठाळकर, संगीता जगताप,अधिसभा सदस्य सचिन गोरडे,अधिष्ठाता प्रा. डॉ. संजय तांबट, प्रा.डॉ. विलास आढाव, प्रा. डॉ. गीता शिंदे प्रा. डॉ. वैभव जाधव आदी मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.

याप्रसंगी शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande