वर्धापनदिनी मनसेला मोठे यश रेणापुर तालुक्याचे पटकावलं सभापतीपद
लातूर, 10 मार्च (हिं.स.)। मनसेनं मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यामधील रेणापूर पंचायत समितीचं सभापतीपद पटकावलं आहे. रेणापूरमध्ये मनसे आणि भाजपा युतीची सत्ता आली असून, भाजपाच्या पाठिंब्याने येथे मनसेच्या मोनिका सूर्यवंशी सभापतीपदी विराजमान झाल्या आहेत. त
मनसे


लातूर, 10 मार्च (हिं.स.)। मनसेनं मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यामधील रेणापूर पंचायत समितीचं सभापतीपद पटकावलं आहे. रेणापूरमध्ये मनसे आणि भाजपा युतीची सत्ता आली असून, भाजपाच्या पाठिंब्याने येथे मनसेच्या मोनिका सूर्यवंशी सभापतीपदी विराजमान झाल्या आहेत. तर भाजपाचे शरद दरेकर यांनी उपसभापतीपद पटकावले आहे. काल मनसेचा २० वा वर्धापन दिन साजरा झाला असून, मनसेप्रमुखराज ठाकरे यांनीही रायगड येथे जाऊन पक्षाचा वर्धापन दिन साजरा केला. दरम्यान, पक्षाच्या वर्धापन दिनी मनसेला मोठं यश मिळालं आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या समितीच्या निवडणुकीत रेणापूर पंचायत समितीमधील आठपैकी तीन जागांवर भाजपाने विजय मिळवला होता. तर काँग्रेसलाही तीन जागा मिळाल्या होत्या. तर मनसेला २ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे येथे मनसे किंगमेकरच्या भूमिकेत होती. तसेच मनसेचे दोन सदस्य ज्या पक्षाला पाठिंबा देणार, त्याची सत्ता येणार अशी परिस्थिती होती. अखेरीस मनसे आणि भाजपाची युती होऊन पक्षाला सभापतीपदाची लॉटरी लागली.

रेणापूर पंचायत समितीचं सभापतीपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव होतं. अशा परिस्थितीत सभापतीपदाची संधी कुणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता होती. दरम्यान, आज झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपा आणि मनसे युतीच्या मोनिका सूर्यवंशी यांनी बाजी मारली. तर भाजपाचे शरद दरेकर हे उपसभापतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande