कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ५० लाखांचे सानुग्रह अनुदान
लातूर, 10 मार्च (हिं.स.)कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ५० लाखांचे सानुग्रह अनुदान कोरोना महामारीच्या काळात कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झालेल्या पोलीस अमलदाराच्या कुटुंबियांना महाराष्
पोलीस कर्मचारी


लातूर, 10 मार्च (हिं.स.)कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ५० लाखांचे सानुग्रह अनुदान

कोरोना महामारीच्या काळात कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झालेल्या पोलीस अमलदाराच्या कुटुंबियांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान प्रदान करण्यात आले. हा धनादेश पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या हस्ते कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला.

कोरोना महामारीच्या अत्यंत कठीण व अभूतपूर्व परिस्थितीत संपूर्ण देशासह लातूर जिल्ह्यात पोलीस दलाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र कर्तव्य बजावले. संसर्गाचा मोठा धोका असतानाही पोलीस अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर उतरून लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी, जमावबंदीचे पालन तसेच अत्यावश्यक सेवांचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडत होते.

याच काळात नागरिकांच्या सेवेसाठी कर्तव्य बजावत असताना लातूर पोलीस दलातील पोलीस अमलदार राजकुमार शिवाजी लोखंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान २१ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांचे निधन झाले. कर्तव्यनिष्ठा व समाजसेवेच्या भावनेतून त्यांनी दिलेले योगदान पोलीस दलासाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कर्तव्यावर असताना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद आहे. त्यानुसार पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर यांच्या मार्फत संबंधित प्रकरणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.

यावेळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत असताना प्राणांची आहुती देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच अशा कठीण प्रसंगी पोलीस विभाग संबंधित कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभा असून शासनाकडून मिळालेली ही आर्थिक मदत कुटुंबियांना आधार देणारी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande