रत्नागिरी जि. परिषदेचे आदर्श शाळा पुरस्कार जाहीर
रत्नागिरी, 10 मार्च, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा परिषदेचे आदर्श शाळा पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. ग्रामीण भागातील शाळांना आदर्श शाळा पुरस्कार (जि.प.सेस योजना) योजनेअंतर्गत तालुकानिहाय शाळांची आदर्श शाळा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पुरस्कारा
रत्नागिरी जि. परिषदेचे आदर्श शाळा पुरस्कार जाहीर


रत्नागिरी, 10 मार्च, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा परिषदेचे आदर्श शाळा पुरस्कार आज जाहीर करण्यात आले.

ग्रामीण भागातील शाळांना आदर्श शाळा पुरस्कार (जि.प.सेस योजना) योजनेअंतर्गत तालुकानिहाय शाळांची आदर्श शाळा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पुरस्कारासाठी जिल्हा पातळीवरील निवड समितीची सभा ६ मार्च रोजी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आदर्श शाळा निवडीसाठी उपस्थितीचे शेकडा प्रमाण, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, शैक्षणिक मार्गदर्शन, शासनाच्या विविध योजना, शैक्षणिक उठाव, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्र.2, शाळेतील उपक्रम, नवभारत साक्षरता अभियान इत्यादी निकषांचा विचार करण्यात आला.

त्यानुसार जाहीर झालेल्या पुरस्कारप्राप्त शाळा अशा - कनिष्ठ प्राथमिक शाळा गट - मंडणगड - जि. प. प्राथमिक शाळा गांधी चौक, दापोली - जि.प.प्राथमिक शाळा आंजर्ले नं. 1, खेड - जि. प. प्राथमिक शाळा आंबडस सोलकरवाडी, चिपळूण - जि. प. प्राथमिक शाळा आंबतखोल तांबडवाडी, गुहागर - जि. प. प्राथमिक शाळा पाचेरीसडा नं.2 कवठीवाडी, संगमेश्वर - जि. प. प्राथमिक शाळा तुरळ सुवरेवाडी, रत्नागिरी - जि. प. प्राथमिक शाळा नाखरे भगवती नं. 2, लांजा - जि.प.प्राथमिक शाळा वेसुर्ले, राजापूर -जि.प.प्राथमिक शाळा कोंडिवळे गोतावडेवाडी.

वरिष्ठ प्राथमिक शाळा गट - मंडणगड - जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा पालघर मराठी, दापोली - जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा शिर्दे, खेड - जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा चिंचघर दस्तुरी, चिपळूण - जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा वालोटी नं.1, गुहागर - जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा वरवेली नं. 1, संगमेश्वर - जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा गोठणे पुनर्वसन हातीव, रत्नागिरी - जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा भोके मायंगडेवाडी, लांजा - जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा इसवली सुतार, राजापूर - जि. प. पूर्ण प्राथमिक गोखले कन्याशाळा.

आदर्श शाळा पुरस्कार समितीच्या सभेला शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नीलिमा नाईक, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) चंद्रकांत सूर्यवंशी, स.रा.देसाई अध्यापक विद्यालय प्राचार्य विक्रांत रावराणे व राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक जि.प. प्राथ. आदर्श शाळा वाटद कवठेवाडी ता जि. रत्नागिरी माधव विश्वनाथ अंकलगे उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande