
नाशिक, 10 मार्च (हिं.स.)। नाशिक शहराच्या तापमानाने आता 36 ओलांडली असून सोमवारी सायंकाळी यावर्षीचे सर्वात जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील येणाऱ्या काळात अधिक उष्णतेच्या झळा लागण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करीत आहे.
मागील काही दिवसापासून मार्च महिन्यातच उन्हाचे चटके लागत होते. सातत्याने या वर्षी उन्हाळ्यामध्ये तापमानात वाढ होत होती फेब्रुवारीच्या मध्या मध्ये 35 अंश डिग्री सेल्सिअस असलेले तापमान हे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस 36 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते परंतु आता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्या संपल्यानंतर आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी नाशिकचे तापमान हे 37 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत गेले आहे यामुळे संपूर्ण दिवसभर नाशिककरांना मोठ्या प्रमाणावर उन्हाचा सामना करावा लागला उन्हाचे चटके बसले आता येणाऱ्या काळामध्ये हे तापमान वाढण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करीत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV