गॅसचा पुरवठा झाल्याने प्रश्न लवकरच सुटेल - योगेश कदम
- हॉटेल बंद झाल्याची माहिती नाही! मुंबई, १० मार्च (हिं.स.) : एलपीजी सिलेंडर पुरवठा बाधित झाल्याने हॉटेल बंद झालीत, अशी उदाहरणं आमच्यासमोर आली नाहीत. कमर्शिअल वापरासंदर्भात केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, घरगुती वापरासंदर्भात काही अ
योगेश कदम


- हॉटेल बंद झाल्याची माहिती नाही!

मुंबई, १० मार्च (हिं.स.) : एलपीजी सिलेंडर पुरवठा बाधित झाल्याने हॉटेल बंद झालीत, अशी उदाहरणं आमच्यासमोर आली नाहीत. कमर्शिअल वापरासंदर्भात केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, घरगुती वापरासंदर्भात काही अडचणी नाहीत. स्टोअरेज असतं तर सुविधा असतात. तुटवडा पुढील काही दिवसात नसेल, कारण जो गल्फमधील गॅसचा साठा आहे, तो पुरवठा आपल्याला झालाय. त्यामुळे हा प्रश्न लवकरच सुटेल, असा विश्वास अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला आहे.

तेल पुरवठ्याच्या समस्येचा परिणाम व्यावसायिक आणि उद्योगांवर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कदम यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारनं जे आदेश दिलेत, त्याचे पालन आम्ही करत आहोत. युद्धजन्य परिस्थिती झाली आहे. त्यामुळे प्रश्न निर्माण झालाय. मुख्यमंत्री या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेऊन आहेत. उपाययोजना आणि इतर गोष्टींबद्दल ते निर्णय घेतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande