गॅसच्या तुटवड्यावरून रोहिणी खडसे यांनी सरकारला दिला इशारा
जळगाव, 10 मार्च (हिं.स.)मध्य पूर्वेतील अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील सुरु असलेल्या युद्धामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात घरगुती गॅस, नैसर्गिक वायू आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागले असून यावरून सरकारवर विरोधकांकडून निशाणा साधला जात आह
गॅसच्या तुटवड्यावरून रोहिणी खडसे यांनी सरकारला दिला इशारा


जळगाव, 10 मार्च (हिं.स.)मध्य पूर्वेतील अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील सुरु असलेल्या युद्धामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात घरगुती गॅस, नैसर्गिक वायू आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागले असून यावरून सरकारवर विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारला इशारा दिला आहे रोहिणी खडसे म्हणाल्या की, आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाची झळ आता भारतातील सामान्य जनतेलाही बसू लागली आहे. या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. मुंबई – पुणे सारख्या शहरांमध्ये गॅसच्या अभावी हॉटेल्स, खानावळी हळूहळू बंद होत आहे.

मुंबई – पुणे आणि परिसरात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. तसेच परिस्थिती आटोक्यात आली नाही तर घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण होण्यास सुरुवात होईल. शासनाने यात गांभीर्याने लक्ष घालून तोडगा काढावा, हवं तर केंद्राशी बोलून यावर तोडगा काढावा अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, गॅसचा तुटवडा जाणवू लागल्याने केंद्र सरकारने देशभरात एस्मा अर्थात आवश्यक सेवा पुरवठा अधिनियम कायद्याची अंमलबजावणी केली आहे. या कायद्यामुळे आता देशभरात आवश्यक वस्तूंची साठवणूक आणि काळा बाजार करण्यावर प्रतिबंध लागणार आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारने घरगुती एलपीजीला प्राधान्य देण्यासाठी रिफायनरीजना निर्देश दिले आहेत. कमर्शियल क्षेत्रातील पुरवठा मर्यादित करून घरगुती वापरासाठी साठा वाढवला जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवर अवलंबून राहावे आणि आवश्यकतेनुसारच बुकिंग करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande