जळगाव - खोट्या लिंकपासून सावध राहण्याचे परिवहन विभागाचे आवाहन
जळगाव , 10 मार्च (हिं.स.) ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी व ई-चलनच्या नावाखाली खोट्या लिंकद्वारे नागरिकांची फसवणूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे वाहनचालकांनी केवळ अधिकृत शासकीय संकेतस्थळे वाहन नोंदणीसाठी VAHAN (https:/
जळगाव - खोट्या लिंकपासून सावध राहण्याचे परिवहन विभागाचे आवाहन


जळगाव , 10 मार्च (हिं.स.) ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी व ई-चलनच्या नावाखाली खोट्या लिंकद्वारे नागरिकांची फसवणूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे वाहनचालकांनी केवळ अधिकृत शासकीय संकेतस्थळे वाहन नोंदणीसाठी VAHAN (https://vahan.parivahan.gov.in), ड्रायव्हिंग लायसन्स सेवांसाठी SARATHI (https://sarathi.parivahan.gov.in), परिवहन सेवा (https://www.parivahan.gov.in) तसेच ई-चलन भरण्यासाठी (https://echallan.parivahan.gov.in) या संकेतस्थळांचा वापर करावा. ही सर्व संकेतस्थळे gov.in या डोमेनने समाप्त होतात. यांचाच वापर करावा. com, .online, .site, .in अशा डोमेनवरील कोणत्याही संशयास्पद संकेतस्थळांवर नागरिकांनी माहिती भरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. RTO किंवा परिवहन विभागाकडून WhatsApp द्वारे कोणतीही पेमेंट लिंक पाठविली जात नाही. तसेच संशयास्पद लिंक किंवा APK अॅप्स डाउनलोड करू नयेत. फसवणुकीचा संशय आल्यास WWW.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी किंवा १९३० हेल्पलाईनवर जवळचे जिल्हा सायबर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande