महसूलची वारी शेतकऱ्यांच्या दारी : नुकसान गाव भरपाई वाटपासाठी भेट दौरा कार्यक्रम
सोलापूर, 10 मार्च (हिं.स.) महाराष्ट्र शासन महसूल विभागांतर्गत महसूलची वारी, शेतकऱ्यांच्या दारी या उपक्रमाअंतर्गत नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ग्रीनफिल्ड कॉरीडोर प्रकल्पामुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप करण्यासाठी गाव भेट दौरा कार्यक्रम आयोज
महसूलची वारी शेतकऱ्यांच्या दारी : नुकसान गाव भरपाई वाटपासाठी भेट दौरा कार्यक्रम


सोलापूर, 10 मार्च (हिं.स.)

महाराष्ट्र शासन महसूल विभागांतर्गत महसूलची वारी, शेतकऱ्यांच्या दारी या उपक्रमाअंतर्गत नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ग्रीनफिल्ड कॉरीडोर प्रकल्पामुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप करण्यासाठी गाव भेट दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी सीमा होळकर यांनी दिली आहे.

उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.11) कार्यालय, कृष्णा खोरे, सोलापूर यांच्या वतीने ज्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई नोटीस मिळूनही अद्याप रक्कम स्वीकारलेली नाही, अशा खातेदारांना थेट गावात जाऊन नुकसान भरपाई वाटप करण्याची योजना आखण्यात आली आहे. या दौऱ्यांतर्गत दक्षिण सोलापूर, बार्शी आणि अक्कलकोट तालुक्यातील विविध गावांमध्ये महसूल जनसंवाद कार्यक्रम होणार असून, मंडळ अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालये तसेच सांस्कृतिक सभागृह अशा ठिकाणी शेतकऱ्यांना थेट नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande