लातूर जिल्ह्यात पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडी जाहीर
लातूर, 10 मार्च (हिं.स.)। लातूर जिल्हा परिषद अंतर्गत तालुकास्तरीय पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. विविध तालुक्यांमध्ये नव्या पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात हालचालीं
पंचायत समिती


लातूर, 10 मार्च (हिं.स.)। लातूर जिल्हा परिषद अंतर्गत तालुकास्तरीय पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. विविध तालुक्यांमध्ये नव्या पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे.

जाहीर झालेल्या निवडी पुढीलप्रमाणे —

लातूर पंचायत समिती : श्रीकांत माणिकराव बैले – सभापती, महेश राजासाहेब चव्हाण – उपसभापती

औसा पंचायत समिती : गंगाबाई माणिकराव कोदळीकर (थोरात) – सभापती, अमोल साहेबराव पाटील – उपसभापती

निलंगा पंचायत समिती : सुनिता संतोष वाघमारे – सभापती, अर्चिनी बालाजी माने – उपसभापती

उदगीर पंचायत समिती : वनमाला तात्यारावडी मरतापळे – सभापती, भोसले बापूसाहेब उद्धवराव – उपसभापती

अहमदपूर पंचायत समिती : सूरज बाबासाहेब पाटील – सभापती, अयोध्या अशोक केंद्रे – उपसभापती

रेणापूर पंचायत समिती : मोनिका रवी सूर्यवंशी – सभापती, शरद माणिकराव दरेकर – उपसभापती

चाकूर पंचायत समिती : जयरश्री नागरगोजे – सभापती, भुजंग शिंदे – उपसभापती

जळकोट पंचायत समिती : सुनीता संभाजी कोसांबे – सभापती, माधव जळबा वाघमारे – उपसभापती

देवणी पंचायत समिती : अंकिता सुशांत पाटील – सभापती, बाळासाहेब माधवराव पाटील – उपसभापती

शिरूर अनंतपाळ पंचायत समिती : संजय सूर्यवंशी – सभापती, पूनम पाटील – उपसभापती

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande