सरकोली-रांजणी-शंकरगाव रस्ता होणार ‘प्रमुख जिल्हा मार्ग’
सोलापूर, 10 मार्च (हिं.स.)। पंढरपूर तालुक्यातील सरकोली-रांजणी-शंकरगाव या 12 कि.मी. लांबीच्या ग्रामीण रस्त्याला आता प्रमुख जिल्हा मार्ग (एमडीआर) म्हणून अधिकृत मान्यता मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवे
सरकोली-रांजणी-शंकरगाव रस्ता होणार ‘प्रमुख जिल्हा मार्ग’


सोलापूर, 10 मार्च (हिं.स.)।

पंढरपूर तालुक्यातील सरकोली-रांजणी-शंकरगाव या 12 कि.मी. लांबीच्या ग्रामीण रस्त्याला आता प्रमुख जिल्हा मार्ग (एमडीआर) म्हणून अधिकृत मान्यता मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून सरकोली ग्रामस्थांची ही अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे गावच्या विकासाला आता नवी गती मिळणार आहे.सरकोली-रांजणी-शंकरगाव हा रस्ता दर्जोन्नत करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून विशेष प्रयत्न सुरू होते.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे खासगी सचिव सुधाकर भोसले यांच्या माध्यमातून सातत्याने यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. या प्रयत्नांना यश आल्याने सरकोली परिसरातील दळणवळणाचा प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी आ. राजू खरे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे मोठे सहकार्य लाभले. या सर्व नेत्यांच्या समन्वयामुळे सरकोलीच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेला आहे.चंद्रभागा आणि माणगंगा या नद्यांच्या संगमावर सरकोली हे गाव वसलेले आहे. ते संपूर्ण बागायत क्षेत्र म्हणून ओळखले जाते. ऊस, द्राक्ष, डाळिंब आणि केळी अशा नगदी पिकांच्या वाहतुकीसाठी या रस्त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हे गाव पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होत आहे. त्यामुळे ग्रामीण रस्त्याचे रूपांतर ‘प्रमुख जिल्हा मार्गात’ होणे तांत्रिकदृष्ट्या गरजेचे होते, ते झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande