
सोलापूर, 10 मार्च (हिं.स.)।
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्यासह सात जणांचे मोबाईल सीडीआर व टॉवर लोकेशन न्यायालयात दाखल केले खरे पण ते प्रोटेक्टिव्ह असल्याने उघडताच आले नाहीत. त्यामुळे कागदोपत्री सीडीआर व लोकेशन देण्यात यावेत असे आदेश न्यायालयाने दिले. सीडीआर व टॉवर लोकेशन देण्यासाठी का टाळाटाळ केली जात आहे असा प्रश्न सध्या उपस्थित होतो.
प्रसिध्द न्युरो फिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात वर्ष होत असतना अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरीत असून या खटल्यास वेगवेगळी वळणे येत आहेत. सीडीआर व टॉवर लोकेशन बाबत न्यायालयात सुनावणी होती. यामध्ये सरकार पक्षाने डॉ. शिरीष यांच्यासह सात जणांचे सीडीसार व टॉवर लोकेशन सीडीच्या माध्यमातून जमा केले. ती सीडी मनिषा मुसळे-मानेचे वकिल ॲड. प्रशांत नवगिरे यांनी न्यायालयातच तपासली. सदर सीडीत मोबाईल क्रमांकाचा सीडीआर व टॉवर लोकेशन चा डाटा हा प्रोटेक्टेड होता त्यास पासवर्ड होता. त्यामुळे डॉ. शिरीष यांच्यासह सात जणांच्या सीडीआर व टॉवर लोकेशन ची माहिती मिळू शकली नाही. ॲड. नवगिरे यांनी पुन्हा न्यायालयात अर्ज दाखल करून डॉ. शिरीष यांच्या महत्त्वाच्या मोबाईल क्रमांकासह इतर सात मोबाईल क्रमांकाची माहिती हे कागदपत्राच्या माध्यमातून पुरवण्यात यावी असा अर्ज दाखल केला. जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांनी सरकार पक्षास कागदपत्रांव्दारे माहिती देण्याचे आदेश दिले. 13 मार्च रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. या प्रकरणात आरोपीतर्फे अँड प्रशांत नवगिरे तर सरकारतर्फे ॲड आनंद कुर्डुकर काम पाहत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड