रत्नागिरी : नर्सरी व्यावसायिकांना वीज सवलतीची आ. शेखर निकम यांची मागणी
रत्नागिरी, 10 मार्च, (हिं. स.) : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नर्सरी व्यवसाय करणाऱ्या लहान शेतकऱ्यांना सवलतीत वीजपुरवठा करण्याची मागणी चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी विधिमंडळ सभागृहात केली. नर्सरी व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या पंपांना शेती
रत्नागिरी : नर्सरी व्यावसायिकांना वीज सवलतीची आ. शेखर निकम यांची मागणी


रत्नागिरी, 10 मार्च, (हिं. स.) : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नर्सरी व्यवसाय करणाऱ्या लहान शेतकऱ्यांना सवलतीत वीजपुरवठा करण्याची मागणी चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी विधिमंडळ सभागृहात केली. नर्सरी व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या पंपांना शेती वर्गात समाविष्ट करून वीज सवलत देण्याची मागणी त्यांनी केली.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने लहान स्वरूपाच्या रोपवाटिका चालवल्या जातात. या नर्सरींसाठी ३ एचपी, ४ एचपी आणि ५ एचपी क्षमतेचे पंप वापरले जातात. मात्र या नर्सरींचा समावेश शेतीच्या ‘एजी’ वर्गात होत नसल्यामुळे त्यांना ७.५ एचपीपर्यंतच्या शेती पंप वीज सवलत योजनेचा लाभ मिळत नसल्याची बाब आमदार निकम यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

कोकणातील शेतकरी प्रामाणिकपणे शेती व्यवसाय करत असून विजेची चोरी न करता नियमांनुसार वीज वापर करतात. त्यामुळे नर्सरीमध्ये वापरले जाणारे ७.५ एचपीपेक्षा कमी क्षमतेचे पंप शेती वर्गात समाविष्ट करून त्यांना वीज सवलत देण्याचा विचार शासनाने करावा, अशी मागणी श्री. निकम यांनी केली.

यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, अशा प्रकारचे वर्गीकरण थेट महावितरण करत नाही. त्यासाठी स्वतंत्र मान्यता आवश्यक असते. सध्या नर्सरींसाठी वेगळा विशेष दर लागू करण्यात आला आहे. मात्र आमदार शेखर निकम यांनी केलेल्या मागणीचा विचार करून शेतकऱ्यांना आणखी काही दिलासा देता येईल का, याबाबत सकारात्मक विचार केला जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande