महिला, संपत्ती आणि शहाणपण : आर्थिक सज्जतेची ताकद
एका अनिश्चित जगात, आयुष्यातील विविध टप्प्यांवर आर्थिकदृष्ट्या सज्ज राहणे आणि अनपेक्षित प्रसंगांसाठी आर्थिक ताकद तयार करणे, ही काळाची गरज आहे. अलीकडच्या काळात महिलांचा श्रमशक्तीतील सहभाग वाढला असला तरी, एका
पूनम टंडन


एका अनिश्चित जगात, आयुष्यातील विविध टप्प्यांवर आर्थिकदृष्ट्या सज्ज राहणे आणि अनपेक्षित प्रसंगांसाठी आर्थिक ताकद तयार करणे, ही काळाची गरज आहे. अलीकडच्या काळात महिलांचा श्रमशक्तीतील सहभाग वाढला असला तरी, एका अलीकडील सर्वेक्षणानुसार भारतातील महिलांमधील आर्थिक साक्षरतेचे प्रमाण केवळ २० टक्क्यांच्या वर आहे.

आर्थिक सज्जता म्हणजे केवळ पैसे कमावणे आणि ती जतन करणे नव्हे. दीर्घकालीन आर्थिक ताकद निर्माण करण्याची प्रक्रिया होय. ती प्रक्रिया आर्थिक जागरूकता आणि आत्मविश्वासापासून सुरु होते. आज डिजिटल माध्यमाद्वारे किंवा इतर मार्गांनी उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे वैयक्तिक पातळीवर, मूलभूत आणि प्रगत आर्थिक संकल्पना समजून घेऊन हे साध्य करता येते. धोरणकर्ते आणि वित्तीय संस्था देखील आता महिलांसाठी विशेष उत्पादने, वितरण नेटवर्क आणि आर्थिक प्रणाली तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यामध्ये महिलांचे उत्पन्न, आयुष्यातील टप्पे, आरोग्याच्या गरजा, आकांक्षा आणि गुंतवणुकीचे वर्तन यांचा विचार केला जातो.

जागरूकतेकडून कृतीकडे जाण्याचा प्रवास तितकाच महत्त्वाचा आहे. बचत, गुंतवणूक आणि आर्थिक संरक्षणाच्या दिशेने पावले उचलून आणि आपल्या आर्थिक पोर्टफोलिओचे वेळोवेळी स्वतंत्रपणे पुनरावलोकन करून, महिला स्वतःला आर्थिक नियोजनात सक्षम करू शकतात. ज्ञान आणि अनुभव यातूनच 'शहाणपण' प्राप्त होते.

आज महिला पूर्वीपेक्षा अधिक जागरूक आहेत आणि त्यांना वित्तापर्यंत अधिक प्रवेश मिळत आहे. आज भारतातील म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांपैकी २५% महिला आहेत. ८९% पेक्षा जास्त भारतीय महिलांकडे आता बँक खाती आहेत, जे जागतिक स्तरावर आर्थिक समावेशनाच्या सर्वात वेगवान विस्तारांपैकी एक आहे. मात्र, यापैकी बहुतेक खाती प्रामुख्याने व्यवहार किंवा पैसे काढण्यासाठी वापरली जातात. दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी किंवा गुंतवणुकीसाठी नाहीत. त्यामुळे, महिलांसाठी खरा फरक 'मालकी' आणि 'आर्थिक व्यवस्थापन' यामध्ये आहे. एक उत्साहवर्धक अशासाठी आहे की, गेल्या काही वर्षांत स्वतंत्र आर्थिक निर्णय घेण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. महिला तज्ज्ञांकडून आर्थिक सल्ला देखील घेत आहेत, जे विविध स्तरांवर सुरू राहणे आवश्यक आहे.

आर्थिक सज्जता ही व्यक्ती अनिश्चिततेचा सामना किती प्रभावीपणे करते, यावर मोजली जाऊ शकते. या संदर्भात विमा महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. महिलांच्या बाबतीत, आर्थिक सज्जतेची गरज अधिक महत्त्वाची ठरते. अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे की, पुरुषांच्या तुलनेत महिलांचे आयुर्मान जास्त असते, ज्यामुळे विमा कंपन्या महिला ग्राहकांना सवलतीच्या दरात प्रीमियम देऊ शकतात. याचा अर्थ असा की, महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा कालावधी दीर्घ असू शकतो आणि आरोग्यसेवा आणि राहणीमानाचा खर्च लक्षात घेऊन पुरेशी सुरक्षा व्यवस्था निर्माण केली पाहिजे.

वित्तीय कल्याणाची मूलभूत तत्त्वे कायम आहेत – लवकर बचत सुरू करा आणि नियमित गुंतवणूक करा. हे सर्व आपल्या जोखमीची क्षमता, ध्येये आणि आकांक्षांच्या मर्यादेत राहून करणे महत्त्वाचे आहे, ज्या कालांतराने बदलत जातील. म्हणून, आर्थिक व्यवस्थापन ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, जी आर्थिक साधने आणि संपत्ती निर्मितीच्या संधींच्या सखोल ज्ञानासह करणे सर्वोत्तम आहे. खर्चाचा मागोवा घेणे, निवृत्तीचे नियोजन, ध्येय-आधारित गुंतवणूक, यांसारख्या मुख्य घटकांशिवाय आर्थिक नियोजनामध्ये कर्ज व्यवस्थापन, कर ऑप्टिमायझेशन आणि पारंपरिक नसलेल्या गुंतवणुकीच्या संधींचाही समावेश होतो.

तज्ज्ञांच्या मते, महिलांनी त्यांच्या उत्पन्नाच्या किमान २०% हिस्सा गुंतवावा आणि आपली निवृत्ती १००% स्वतंत्रपणे कशी पूर्ण करता येईल, याचे नियोजन करावे. महिलांसाठी लवकर गुंतवणूक सुरू करणे विशेषतः महत्त्वाचे आहे, कारण त्यांना काळजीवाहू (caregiving) सारख्या जबाबदाऱ्यांमुळे करिअरमध्ये ब्रेक घ्यावा लागू शकतो किंवा काही बदल करावे लागू शकतात. हे सर्व निर्णय महत्त्वाचे असले तरी, जर नियोजन नसेल तर त्याचा कालांतराने आर्थिक संचयावर परिणाम होऊ शकतो.

आर्थिकदृष्ट्या सक्षम महिला देशातील गुंतवणुकीचा पूल विस्तारून आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. जेव्हा महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक असतात, तेव्हा त्या त्यांचे कुटुंब आणि समाजाच्या शिक्षण, आरोग्य आणि कल्याणासाठी अधिक गुंतवणूक करतात. या दृष्टीने, महिलांचे सक्रिय आर्थिक नियोजन हे सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देणारे एक शक्तिशाली साधन ठरू शकते. आज भारतातील महिला उद्योजकांची वाढती संख्या केवळ आर्थिक वाढीलाच चालना देत नाही, तर ग्राहक उत्पादने आणि सेवांमध्ये नाविन्यही आणत आहे.

दरवर्षी महिला दिन साजरा करत असताना, हे समजून घेणे आवश्यक आहे की, आर्थिक संपत्ती म्हणजे केवळ पैसा नाही; तर ते उद्याच्या उत्तम भविष्यासाठी नियोजन, संरक्षण आणि सज्ज राहण्याचे शहाणपण आहे. मी सर्व महिलांना पैसा, गुंतवणूक, संपत्ती, दुसरे इनिंग (सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य), आरोग्य आणि संरक्षण या विषयांवर अधिक चर्चा करण्याचे आवाहन करतो. वैयक्तिक वित्ताच्या बाबतीत अज्ञान हे सुख नसते. पैशांचे व्यवस्थापन करणे हे एक जीवन कौशल्य (life skill) आहे, ती कोणतीही लिंग-आधारित भूमिका नाही.

  • स्त्रोत: Lxme आणि EY इंडियाचा अहवाल

(लेखिका - पूनम टंडन, मुख्य गुंतवणूक अधिकारी, इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्स कंपनी लि.)

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande