अलिबागमध्ये आगरी समाज संस्थेचा महिला दिन सोहळा; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
रायगड, 11 मार्च (हिं.स.)। आगरी समाज संस्था, अलिबाग यांच्या वतीने जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. आनंद नगर येथील अथर्व फिटनेस सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घ
Women's Day celebration of Agri Samaj Sanstha in Alibaug; Spontaneous participation of women


रायगड, 11 मार्च (हिं.स.)। आगरी समाज संस्था, अलिबाग यांच्या वतीने जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. आनंद नगर येथील अथर्व फिटनेस सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. महिलांना एकत्र आणून त्यांचा सन्मान करणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कार्याची दखल घेणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.

कार्यक्रमाची सुरुवात सौ. जागृती पाटील यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व व इतिहास सांगून केली. त्यांनी महिलांचे सामाजिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक क्षेत्रातील योगदान अधोरेखित करत प्रेरणादायी विचार मांडले. यावेळी उपस्थित सर्व महिलांनी महिला सक्षमीकरणासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याची सामूहिक शपथ घेतली.

कार्यक्रमात विविध मनोरंजनात्मक आणि उत्साहवर्धक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संगीत खुर्ची, हौजी यांसारखे खेळ खेळण्यात आले. या खेळांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. संपूर्ण कार्यक्रमात आनंदी व मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण झाले. खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांना संस्थेचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी प्रायोजित केलेली बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच सुनिल रेफ्रिजरेशनचे मालक व संस्थेचे उपाध्यक्ष सुनिल तांबडकर यांच्या वतीने सहभागी सर्व महिलांना आकर्षक गृहोपयोगी चॉपर भेट देण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande