रत्नागिरी : खेडमध्ये शनिवारी छ. शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर
रत्नागिरी, 11 मार्च, (हिं. स.) : खेडमधील गोपाळवाडीतील श्री राधाकृष्ण मंदिर येथे शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. खेड तालुक्यातील श्री राधाकृष्ण मंदिर सुकिवली (गोपाळवाडी) येथे दि. 14 मार्च रोजी सकाळी 10 त
रत्नागिरी : खेडमध्ये शनिवारी छ. शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर


रत्नागिरी, 11 मार्च, (हिं. स.) : खेडमधील गोपाळवाडीतील श्री राधाकृष्ण मंदिर येथे शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

खेड तालुक्यातील श्री राधाकृष्ण मंदिर सुकिवली (गोपाळवाडी) येथे दि. 14 मार्च रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे. सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रांताधिकारी वैशाली पाटील यांनी केले आहे.

महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर अशा शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार खेडचे शिबिर शनिवारी होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande