
अकोला, 12 मार्च (हिं.स.) हिंदू वर्ष 19 मार्चपासून सुरू होत असून अकोला शहरांमध्ये 16 राम मंदिर असून या मंदिरामध्ये भाविकांची गर्दी असते त्या पार्श्वभूमीवर त्या भागातील साफसफाई पथदिवे ची व्यवस्था मनपा ने करावी तसेच राजस्थानी समाजातील सर्वात मोठा उत्सव गंगोर उत्सव 21 मार्च रोजी असून खोलेश्वर परिसरात विशेष पथदिवे व गणगोर घाट इथे सुद्धा मातृ शक्ती मोठ्या संख्येने येत असतात या भागात विशेष व्यवस्था पथदिवे घाट सजावट करण्यात यावी अशी मागणी भाजपा प्रसिद्धीप्रमुख व माजी नगरसेवक गिरीश जोशी यांनी केली.
महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासन तसेच महापौर सभापती यांनी यासंदर्भात दखल घेऊन अकोला शहरांमध्ये मोठे राम मंदिर, गांधी रोड मधील छोटे राम मंदिर, श्रीराम चौक येथील राम मंदिर गौरक्षण रोड मधील राम मंदिर खेतान नगर मधील राम मंदिर, संतोषी माता राम मंदिर चतुर्भुज कॉलनी राम मंदिर, रामदास पेठ मधील तसेच हनुमान वस्ती, माळीपुरा जेल कॉटर्स, अनिकट, कैलास टेकडी तसेच सालासर हनुमान मंदिर परिसरात विशेष व्यवस्था साफसफाई तसेच पथदिव्याची व्यवस्था 19 तारखेच्या आत करावी अशी मागणी माजी नगरसेवक व भाजपा प्रसिद्धीप्रमुख गिरीश जोशी यांनी करून नवरात्राच्या तसेच हिंदू सणाच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने अकोला शहरांमध्ये सांस्कृतिक संवर्धन समितीच्या वतीने विशाल शोभायात्रा मार्गावर सुद्धा साफसफाई आणि रस्त्यावर पाणी सांडपाण्याची व्यवस्था राज राजेश्वर मंदिर ते बारा ज्योतिर्लिंग मंदिर पर्यंत विशेष व्यवस्था करण्यात यावी व शहरातील प्रमुख रस्त्यांची साफसफाई संदर्भात विशेष दखल देण्यात यावी अशी मागणी त्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे