परभणी - पेगरगव्हाण शिवारात 30 वर्षांपासून बंद असलेले रस्ते खुले
परभणी, 12 मार्च (हिं.स.)। मौजे पेगरगव्हाण येथे गाव नकाशावरील तसेच नकाशावर नसलेल्या सर्व गाडीमार्गांचे प्रत्यक्ष स्थळावर जाऊन सीमांकन करण्यात आले असून या मोहिमेदरम्यान अतिक्रमणे हटवून मागील सुमारे 30 वर्षांपासून बंद असलेले काही जुने रस्ते
पेगरगव्हाण शिवारात 30 वर्षांपासून बंद असलेले रस्ते खुले


परभणी, 12 मार्च (हिं.स.)। मौजे पेगरगव्हाण येथे गाव नकाशावरील तसेच नकाशावर नसलेल्या सर्व गाडीमार्गांचे प्रत्यक्ष स्थळावर जाऊन सीमांकन करण्यात आले असून या मोहिमेदरम्यान अतिक्रमणे हटवून मागील सुमारे 30 वर्षांपासून बंद असलेले काही जुने रस्ते पुन्हा खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे गावातील वाहतूक तसेच शेतकर्यांच्या शेतीकामासाठी मोठी सुविधा निर्माण झाली आहे.

या मोहिमेदरम्यान संबंधित रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून रस्ते कायमस्वरूपी मजबूत व स्पष्ट राहावेत यासाठी सीमांकन करण्यात आले. तसेच गावातील नागरिकांना सार्वजनिक रस्त्यांचे महत्त्व आणि शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती देऊन जनजागृतीही करण्यात आली. गावकर्यांनी शासनाच्या या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत अतिक्रमण हटविण्यासाठी स्वखुशीने सहकार्य केले.

या सामूहिक प्रयत्नांमुळे अनेक वर्षांपासून बंद असलेले रस्ते मोकळे करण्यात यश मिळाले आहे. सदर कार्यवाही उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले तसेच तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या कारवाईत मंडळ अधिकारी जांब विकास आगलावे, ग्राम महसूल अधिकारी बालकृष्ण भोसले, उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे प्रतिनिधी भुसारे व कुलकर्णी, ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश बोरीकर, महसूल सेवक आकाश सूर्यवंशी, मारुती पवार, अशोक चौधरी, ग्रामपंचायत शिपाई परमेश्वर गव्हाणे तसेच सरपंच व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी सहकार्य केले. रस्ते खुले झाल्यामुळे शेतकरी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande