
नांदेड, 12 मार्च, (हिं.स.) - अर्धापूर तालुक्यातील गणपुर येथे श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरा च्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे भव्य व भक्तीमय वातावरणात आयोजन करण्यात आले असून दि. १४ ते १६ मार्च २०२६ दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपू र्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघ णार आहे. यासोहळ्याचे आयोज न श्री. रोहिदास दत्तारामजी पाटी ल बंडाळे यांच्या संकल्पनेतून व समस्त गावकरी मंडळी, गणपूर यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.
सोहळ्यानिमित्त तीन दिवस विविध धार्मिक विधी, कीर्तन, प्रव चन व भजन कार्यक्रमांचे आयो जन करण्यात आले आहे. दि. १४ मार्च रोजी सकाळी गणपती पूजन, पुण्यहवाचन, कलश स्थापना, नवग्रह पूजन, नांदी श्राद्ध आदी विधी वेदघोषात पार पडेल. त्यानंतर धार्मिक ग्रंथ पारायण, भजन व हरिनाम सप्ता हाने वातावरण भारावून जाणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ मार्च अभिषेक, होम हवन, पूर्णाहुती तसेच विविध देवतांची पूजन विधी पार पडणार असून, सायं रोजी सकाळी काळी कीर्तन व प्रवचन कार्य क्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी नामवंत कीर्तन कार व प्रवचनकार उपस्थित राहणार आहेत.
सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम १६ मार्च रोजी सकाळी प्राणप्र तिष्ठा विधीने होणार आहे. वेद पाठी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारात श्री. विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यातयेणार आहे. सकाळी ९.२१ वाज ता शुभमुहूर्तावर मुख्य विधी पार पडणार असून, त्यानंतर आरती व दर्शन सोहळा होणार आहे. याच दिवशी दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व भावि कांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे. सोहळ्यासाठी परिस रातील संत-महंत, मान्यवर व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उप स्थित राहणार आहेत. या भव्य धार्मिक सोहळ्यामुळे गणपूर गावात आध्यात्मिक उर्जा निर्माण झाली असून, गावकऱ्यांनी एको प्याने केलेल्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठे मुळे गावाच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेला नवे बळ मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis