पंचवटीतील श्रीकाळाराम मंदिरात “विश्व अग्निहोत्र दिवस” निमित्त सामुदायिक अग्निहोत्र
नाशिक, 12 मार्च (हिं.स.): जगद्गुरू भगवान दत्तात्रेय यांच्या गुरुपरंपरेतील आणि अक्कलकोटच्या श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या गुरुपीठाचे उत्तराधिकारी, सत्यधर्म प्रणेता परमसद्गुरू श्री गजानन महाराज, शिवपुरी (अक्कलकोट) यांच्या आशीर्वादाने १२ मार्च “विश्व
पंचवटीतील श्रीकाळाराम मंदिरात “विश्व अग्निहोत्र दिवस” निमित्त सामुदायिक अग्निहोत्र


नाशिक, 12 मार्च (हिं.स.): जगद्गुरू भगवान दत्तात्रेय यांच्या गुरुपरंपरेतील आणि अक्कलकोटच्या श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या गुरुपीठाचे उत्तराधिकारी, सत्यधर्म प्रणेता परमसद्गुरू श्री गजानन महाराज, शिवपुरी (अक्कलकोट) यांच्या आशीर्वादाने १२ मार्च “विश्व अग्निहोत्र दिवस” निमित्त नाशिक येथे सामुदायिक अग्निहोत्र कार्यक्रम उत्साहात पार पडला.

पंचवटी येथील श्रीकाळाराम मंदिर परिसरात आयोजित या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक सहभागी झाले. कार्यक्रमात अग्निहोत्र विधीचे महत्त्व, पर्यावरण शुद्धीकरण आणि मानवी जीवनावर होणारे सकारात्मक परिणाम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांनी प्रत्यक्ष अग्निहोत्र करून त्याचा आध्यात्मिक अनुभव घेतला.

या प्रसंगी श्रीकाळाराम मंदिराचे विश्वस्त शांताराम अवसरे, शुभम मंत्री, ॲडव्होकेट अक्षय कलंत्री आणि प्रतिक पुजारी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी स्थानिक अग्निहोत्र साधकांनी परिश्रम घेतले असून नाशिककरांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande