
रायगड, 12 मार्च (हिं.स.)। : खोपोली शहरातील नोंदणीकृत कामगारांसाठी शिवतीर्थ कामगार संघटनेतर्फे भांडी व सेफ्टी किट (पेट्या) वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, १३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता खोपोली शहरात संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमात स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभहस्ते कामगारांना भांडी व सेफ्टी किटचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीप शेंडे आणि उपनगराध्यक्ष विक्रम साबळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
शहरातील नोंदणीकृत कामगारांच्या सुरक्षिततेसाठी तसेच त्यांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. या कार्यक्रमाला खोपोली शहरातील शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, विविध अंगिकृत संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवतीर्थ कामगार संघटना, खोपोली शहर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)