
नांदेड, 12 मार्च (हिं.स.)।
नांदेड ग्रामीण पोलीस उपविभागासाठी शासनातर्फे मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 176 (3) अन्वये सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असणाऱ्या गुन्ह्यात फॉरेन्सिक पथकाची भेट अनिवार्य करण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने येथील नांदेड ग्रामीण उपविभागासाठी MH 12 ZC 9869 ही मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन विविध रसायने, साधनसामुग्री व कर्मचाऱ्यांच्या दोन गटांसह
उपलब्ध झाली असून या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे मुख्यालय अर्धापूर येथे अहोरात्र राहील.
या पोलीस उपविभागा अंतर्गत येणाऱ्या अर्धापूर, बारड, मुदखेड व लिंबगाव पोलीस स्टेशनच्या तपासिक अंमलदारांनी गुन्ह्यांच्या घटनास्थळावरील अधिक पुरावे
जमा करण्यासाठी या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या पथकाचा चा उपयोग घेऊन अधिकाधिक गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी संजीवन मिरकले यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis