लातूर - शासकीय योजनांच्या लाभासाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन
लातूर, 12 मार्च (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण विभागातंर्गत दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यात दिव्यांगाची हेळसांड होवू नये व घरबसल्यास योजनेचा लाभ घेणे सोईचे होईल, यादृष्टीकोनातून मुंबई दिव्यांग कल्याण विभागाचे सचि
शासकीय योजना


लातूर, 12 मार्च (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण विभागातंर्गत दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यात दिव्यांगाची हेळसांड होवू नये व घरबसल्यास योजनेचा लाभ घेणे सोईचे होईल, यादृष्टीकोनातून मुंबई दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून राज्य शासनाच्यावतीने दिव्यांग सहाय्यक पोर्टल निर्मिती करण्यात आली आहे. या पोर्टलवर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी ऑनलाईन नोंदणी करुन शासकीय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन लातूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूलकुमार मीना यांनी केले आहे.

केंद्र व राज्य शासनामार्फत दिव्यांग बांधवांना सक्षम बनविण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ दिव्यांगांना सुलभ होण्याच्या दृष्टीने या पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. दिव्यांग बांधवांच्या विविध योजना यात असून विविध विभागातील माहिती यात दर्शविण्यात आली आहे. एकाच छताखाली दिव्यांग बांधवांच्या विविध योजना यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत, यात शासकीय योजनासह सेवा व लाभ यातून मिळणार आहेत. दिव्यांग विद्यार्थी शिष्यवृत्ती, साधने व उपकरणे, स्वंयरोजगारासाठी साधन सामुग्री, अर्थसहाय्य, गुणवत्ता पुरस्कार, सामाजिक सुरक्षा अंतर्गत विवाह प्रोत्साहन अनुदान, विविध शाळा व महाविद्यालयातील प्रवेश, रुग्णालयातील उपचार यासह अनेक योजनांचा या पोर्टलवर समावेश करण्यात आला आहे.

दिव्यांग बांधवांनी https://divyangsahayakportal.maharashtra.gov.in या संकेस्थळावर ऑनलाईन नोंदणी करतांना युआयडी क्रमांक टाकून नोंदणी करावी व विविध योजनांचा लाभ घ्यावा असे कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande