पश्चिम आशिया संकट : अराघची–जयशंकर यांच्यात पुन्हा फोनवर चर्चा
नवी दिल्ली , 13 मार्च (हिं.स.)। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी पुन्हा एकदा फोनवरून चर्चा केली आहे. या चर्चेदरम्यान अराघची यांनी भारताला सध्याच्या परिस्थितीबाबत माहिती दिली. सोशल मीडिया प्लॅ
पश्चिम आशिया संकट :अराघची–जयशंकर यांच्यात पुन्हा फोनवर चर्चा


नवी दिल्ली , 13 मार्च (हिं.स.)। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी पुन्हा एकदा फोनवरून चर्चा केली आहे. या चर्चेदरम्यान अराघची यांनी भारताला सध्याच्या परिस्थितीबाबत माहिती दिली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करत त्यांनी या संभाषणाची माहिती शेअर केली.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी लिहिले, “काल रात्री इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी आणखी एक चर्चा झाली.” त्यांनी पुढे सांगितले की, द्विपक्षीय मुद्द्यांसोबतच ब्रिक्स (BRICS) संदर्भातील विषयांवरही चर्चा झाली.या चर्चेदरम्यान इराणने जागतिक स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी ब्रिक्स देशांमधील अधिक सहकार्याचे आवाहन केले. तसेच आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटनांना इराणविरोधातील कथित लष्करी आक्रमणाचा निषेध करण्याचेही आवाहन केले. जागतिक स्थैर्य राखण्यासाठी ब्रिक्स देशांनी पुढाकार घ्यावा, असेही इराणने म्हटले.

अमेरिका–इस्रायल आणि इराण यांच्यात २८ फेब्रुवारीपासून संघर्ष सुरू आहे. त्यानंतर आतापर्यंत इराणचे परराष्ट्र मंत्री आपल्या भारतीय समकक्षांशी चौथ्यांदा बोलले आहेत.

भारताशी झालेल्या चर्चेनंतर इराणकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, अब्बास अराघची यांनी एस. जयशंकर यांना सध्याच्या परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. त्यांनी या परिस्थितीसाठी अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना जबाबदार धरले आणि या घटनांचा प्रादेशिक तसेच जागतिक स्थैर्यावर परिणाम होत असल्याचे सांगितले.

इराणने आपल्या सरकार, जनता आणि सशस्त्र दलांच्या भूमिकेवर भर देत असेही स्पष्ट केले की, देश स्वसंरक्षणाच्या वैध अधिकाराचा वापर करेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande