जळगावावात सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात घसरण
जळगाव, 14 मार्च (हिं.स.)अमेरिका-इस्रायल-इराणमधील संघर्षाचा जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे देशात एलपीजी गॅसचा तुटवडा आणि दरवाढीचा फटका नागरिकांना बसत आहे. यामुळे सोने आणि चांदीचे दरही उसळी घेण्याचा अंदाज होता. मात्र याउलट होताना दिसत आहे.
संग्रहित लोगो


जळगाव, 14 मार्च (हिं.स.)अमेरिका-इस्रायल-इराणमधील संघर्षाचा जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे देशात एलपीजी गॅसचा तुटवडा आणि दरवाढीचा फटका नागरिकांना बसत आहे. यामुळे सोने आणि चांदीचे दरही उसळी घेण्याचा अंदाज होता. मात्र याउलट होताना दिसत आहे. जळगावच्या सुवर्ण बाजारात सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात घसरण झालीय. त्यामुळे लग्नसराईसह सणासुदीसाठी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये बऱ्यापैकी उत्साह दिसून आला

जळगाव शहरातील सराफ बाजारात आज शनिवारी सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोने दरात १४४२ रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६२ हजार ४३१ रुपयांपर्यंत खालावले. यापूर्वी सोन्यात गुरुवारी ३०९ आणि शुक्रवारी १६४८ रुपयांची घट नोंदवली गेली होती. आजच्या घसरणीनंतर सोन्यात तीन दिवसांत ३३९९ रुपयांची घट झाली आहे आज सोने दरात घसरणी झाली असली तरी दुसरीकडे चांदीच्या दरात वाढ झालीय. जळगाव सराफ बाजारात शनिवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर चांदी दरात प्रति किलो १०३० रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ७३ हजार ९८० रुपयांपर्यंत पोहचले. यापूर्वी गुरुवारी १०३० रुपयांची वाढ झाली तर शुक्रवारी दिवसभरात तब्बल १० हजार ३०० रुपयांची घट नोंदवली गेल्याने दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ७२ हजार ९५० रुपयांपर्यंत घसरले होते. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात किमतींवर सध्या दबावाचे वातावरण कायम असून, मजबूत अमेरिकन डॉलर आणि व्याजदरांबाबतची अनिश्चितता यामुळे मौल्यवान धातुमध्ये घसरण दिसून येत आहे. एकंदरीत सोने आणि चांदी दरात युद्धाचा परिणाम होताना दिसत नसला तरी आगामी दिवसात दोन्ही धातूंचे दर कमी होणार की वाढणार? याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande