
नाशिक, 14 मार्च, (हिं.स.)। पाठलाग व शिवीगाळ करून अश्लील इशारे करून महिलेचा विनयभंग करणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला ही दुपारी तीन वाजेच्या सुमारास सातपूर येथील उद्योग भवन इमारतीजवळून पायी जात होती. त्यावेळी आरोपी बाळासाहेब दत्तात्रय भोर (वय ५२, रा. मैत्रीगौरव अपार्टमेंट, हनुमानवाडी, पंचवटी) याने पीडितेचा पाठलाग केला.
शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली, तसेच आरोपीने त्याच्या मोबाईलमध्ये पीडितेचा व्हिडिओ काढून अश्लील इशारे केले. त्यामुळे स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून विनयभंग केल्याप्रकरणी बाळासाहेब भोरविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV