‘पीएमपी’त महिला असुरक्षित; ५७ टक्के प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण
पुणे, 15 मार्च (हिं.स.)। ‘पीएमपी’ बसधून प्रवास करणाऱ्या महिलांना आजही असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. बसची प्रतीक्षा, थांब्यांवरील अंधार आणि प्रवासातील गर्दी, यामुळे ५७ टक्के महिला प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हे चित्र बदलण्यासाठी ‘पीएमपी’
PMPML


पुणे, 15 मार्च (हिं.स.)।

‘पीएमपी’ बसधून प्रवास करणाऱ्या महिलांना आजही असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. बसची प्रतीक्षा, थांब्यांवरील अंधार आणि प्रवासातील गर्दी, यामुळे ५७ टक्के महिला प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

हे चित्र बदलण्यासाठी ‘पीएमपी’ प्रशासनाने तातडीने ‘जेंडर ॲक्शन प्लॅन’ (लिंगभाव कृती आराखडा) राबविणे गरजेचे आहे,’’ असा निष्कर्ष परिसर संस्थेने काढला असून, त्याचा अहवालदेखील ‘पीएमपी’कडे सादर केला आहे.

परिसर संस्थेच्या तन्झील अल्लापूर आणि श्वेता वेर्णेकर यांनी ‘पीएमपीएमएल’च्या सहव्यवस्थापकीय संचालक अॅलिस पोरे यांची भेट घेऊन अहवाल सादर केला. हडपसरमधील सात बस थांब्यांची तपासणी केली. शिवाय, ५४० महिला प्रवाशांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून अहवाल सादर करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande