दिनदयाल केंद्रात नवीन अभ्यासक्रम सुरु होणार - रुस्तमजी अकडॅमी समवेत सामंजस्य करार
छत्रपती संभाजीनगर, 15 मार्च (हिं.स.)। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दिनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्राच्यावतीने (डीडीयुकेके) ठाणे स्थित प्रख्यात रुस्मजी अकडॅमी ऑफ ग्लोबल करिअर यांच्या समवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार
अ


छत्रपती संभाजीनगर, 15 मार्च (हिं.स.)।

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दिनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्राच्यावतीने (डीडीयुकेके) ठाणे स्थित प्रख्यात रुस्मजी अकडॅमी ऑफ ग्लोबल करिअर यांच्या समवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार तीन नवीन 'इंडस्ट्री एम्बइडेड' अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत, अशी माहिती संचालक डॉ.भारती गवळी यांनी दिली.

मा. कुलगुरू डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगक्षेत्रासोबत सामंजस्य करार करून व्यवसायाभिमुख 'अप्रेंटीशीप इंडस्ट्री एम्बइडेड डिग्री प्रोग्राम' Apprenticeship Embedded Degree Programmes (AEDP) सुरु करण्यात येणार आहेत. या संदर्भात मा.प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषद कक्षात बैठक झाली. यावेळी कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, संचालक डॉ.भारती गवळी तर 'रुस्तमजी अकडॅमी' यांच्या वतीने संचालक डॉ. हनिफ कंजिर व सीओओ करण देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी या सामंजस्य करार वर दोन्ही संस्थाच्यावतीने स्वाक्षरी करण्यात आली. बी.व्होक (इंडस्ट्रीयल ऑटोमेशन) ही पदवी व एम व्होक (इंडस्ट्रीयल ऑटोमेशन) आणि एम व्होक (ऑटोमोबाईल) या पदव्युत्तर शाखेतील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. पदवीचे तीस तर पदव्युत्तरचे प्रत्येकी वीस विद्यार्थी इंडस्ट्री एम्बइडेड' अभ्यासक्रमासाठी नव्याने प्रवेश घेऊ शकणार आहेत . यावेळी डीडीयूकेकेतील डॉ.कुणाल दत्ता, डॉ.विशाल उशीर,डॉ.अमोघ सांबरे, प्रा.गंगाधर बंडेवाड, डॉ.संजय शिंदे, सचिन रायलवार, रत्नदीप हिवराळे, राहुल नारनवरे आदींची उपस्थिती होती.

विभागाच्या वतीने यापूर्वी टीम प्लस एच.आर. सर्व्हिसेस तसेच ऑटोमेक इन्स्टिट्यूट यांच्यासमवेतही सामंजस्य करार (MOU) करण्यात आलेला आहे. या सहकार्याच्या माध्यमातून दोन्ही संस्था एकत्र येऊन बी.व्होक. एम व्होक (इंडस्ट्री एम्बेडेड) कार्यक्रमाची अंमलबजावणी, प्लेसमेंट ड्राइव्ह, इंटर्नशिप, कार्यशाळा इत्यादी उपक्रम राबवतील, ज्यामुळे शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र यांतील अंतर कमी होईल. या प्रसंगी बोलताना प्र कुलगुरू प्रा. डॉ. सरवदे यांनी सांगितले की, हा करार विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्ये व प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रातील अनुभव देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्यांनी नमूद केले की अशा प्रकारचे उपक्रम विद्यापीठाच्या शैक्षणिक धोरणांना उद्योगाच्या बदलत्या गरजांशी जोडतील. प्रा. डॉ. भारती गवळी यांनी विशेष नमूद केले की, या करारामुळे विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास आणि उद्योगसंलग्नतेच्या नवीन संधी निर्माण होतील. या सहकार्याद्वारे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण करिअर संधी उपलब्ध करून देणे आणि प्रदेशातील मनुष्यबळ विकासात योगदान देणे हा उद्देश आहे. हा सामंजस्य करार दोन्ही संस्थांच्या परस्पर प्रगती, नवोन्मेष आणि क्षमता निर्माण या सामायिक बांधिलकीचे प्रतीक आहे, ज्यामुळे कुशल आणि रोजगारक्षम युवकवर्ग घडविण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे, असे डॉ. हनीफ कंजीर म्हणाले.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande