रसिका भातखेडकर दिग्दर्शित बुजगावण नाटकाचे सादरीकरण
छत्रपती संभाजीनगर, 15 मार्च (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर ,डिपार्टमेंट ऑफ परफॉर्मिंग आर्ट च्या वतीने होणाऱ्या 50 व्या नाट्यमहोत्सव मध्ये , विद्यापीठाच्या नाट्य गृहात गोपाळ वाघमारे लिखित ,आणि रसिका भातखे
अ


छत्रपती संभाजीनगर, 15 मार्च (हिं.स.)।

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर ,डिपार्टमेंट ऑफ परफॉर्मिंग आर्ट च्या वतीने होणाऱ्या 50 व्या नाट्यमहोत्सव मध्ये , विद्यापीठाच्या नाट्य गृहात गोपाळ वाघमारे लिखित ,आणि रसिका भातखेडकर दिग्दर्शित बुजगावण या नाटकाचे सादरीकरण झाले. प्रादर्शिक कला विभागाद्वारे सुरू असलेल्या 50 व्या नाट्यमहोत्सवात बुजगावणे या नाटकाच्या माध्यमातून आधुनिक वाद आणि नैसर्गिकता यां दोन गोष्टींचे समाज जीवनात काय महत्त्व आहे यावर भाष्य करण्यात आले. एखाद्या गोष्टीचा जास्त प्रमाणात वापर झाल्यास त्याचा नुकसानही होऊ शकतो

कारण आधुनिक यंत्रांची निर्मिती ही मानवानेच केलेली आहे . जुना आणि नवा या गोष्टी विसरून नाविन्यपूर्ण जीवन निर्माण करण्याची गरज आज आहे. या निसर्गाचा समतोल राखणे हे मानवाच्या हातात आहे असा सुंदर संदेश या नाटकातून देण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande