हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय
पुणे, 15 मार्च (हिं.स.)। ‘सॅटेलाइट टर्मिनल’ म्हणून विकसित होत असलेल्या हडपसर स्थानकाचा आता विस्तार होत आहे. हडपसर स्थानकावर चौथ्या फलाटाला रेल्वे बोर्डाने नुकतीच मंजुरी दिली आहे. येत्या काही महिन्यांत फलाटाच्या बांधकामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल.
हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय


पुणे, 15 मार्च (हिं.स.)।

‘सॅटेलाइट टर्मिनल’ म्हणून विकसित होत असलेल्या हडपसर स्थानकाचा आता विस्तार होत आहे. हडपसर स्थानकावर चौथ्या फलाटाला रेल्वे बोर्डाने नुकतीच मंजुरी दिली आहे. येत्या काही महिन्यांत फलाटाच्या बांधकामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल.

रेल्वे बोर्डाने सध्या १४ डबे बसतील एवढ्या ४०० मीटरच्या फलाटाला मंजुरी दिली आहे. मात्र, रेल्वे प्रशासन २४ डबे सामावतील अशा ६५० मीटर लांबीच्या फलाटासाठी प्रयत्नशील आहे. तसा प्रस्तावही दिला आहे.रेल्वे बोर्ड यासाठी सकारात्मक असून, मंजुरी मिळालेल्या फलाटाच्या विस्तारीकरणाला देखील लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. परिणामी २४ डबे सामावतील असा ६५० मीटर लांबीचा फलाट लवकरच हडपसर स्थानकावर तयार होईल.पुणे स्थानकावरचा ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हडपसर स्थानक ‘सॅटेलाइट टर्मिनल’ म्हणून विकसित केले. सुमारे १०० कोटींचा खर्च करून टर्मिनलचा विकास केला. मात्र स्थानकाचा विस्तार झाला नाही. आता पहिल्यादांच स्थानकाचा विस्तार होत आहे. सध्या हडपसर स्थानकावर तीन फलाट असून, यात आता एका नव्या फलाटाची भर पडत आहे. नवीन फलाट झाल्याने हडपसरहून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ होईल. याचा थेट फायदा प्रवाशांना होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande