अकोल्यात अग्निशमन विभागाची आढावा सभा
– उष्णकालीन आग नियंत्रणासाठी उपाययोजना ठरल्याअकोला, 16 मार्च (हिं.स.) : स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेत महापौर सौ. शारदा रणजीत खेडकर, उपमहापौर अमोल गोगे आणि सभागृहनेता पवन महल्ले यांच्या विशेष उपस्थितीत अकोला अग्
Photo


– उष्णकालीन आग नियंत्रणासाठी उपाययोजना ठरल्याअकोला, 16 मार्च (हिं.स.) : स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेत महापौर सौ. शारदा रणजीत खेडकर, उपमहापौर अमोल गोगे आणि सभागृहनेता पवन महल्ले यांच्या विशेष उपस्थितीत अकोला अग्निशमन विभागाचा आढावा घेतला गेला.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शहरात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने आणि शुक्रवारी गांधी रोडवरील दुकानांमध्ये लागलेल्या आगीसंदर्भातील अडचणी लक्षात घेता ही सभा आयोजित करण्यात आली होती. सभेत अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचे कामकाज, तसेच आगीवर नियंत्रण आणताना आलेल्या अडचणींवर चर्चा करण्यात आली.

शहरातील क्षेत्रफळ आणि लोकसंख्या लक्षात घेऊन आग विझवण्याच्या कामासाठी पाण्याची व्यवस्था सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला. यासाठी सिटी कोतवाली जवळील हाईड्रंट व्यतिरिक्त जुने शहर, हरिहर पेठ, आकोट फैल आणि गणेश घाट येथे नवीन हाईड्रंट बसवण्याचे ठरले. गरज असल्यास खाजगी विहीर अधिगृहीत करून त्यावरही हाईड्रंट सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.

याशिवाय कर्मचाऱ्यांना गणवेश व लागणारे साहित्य पुरविणे, गाड्यांचे इंश्युरन्स अद्ययावत करणे, कॉल रिसीव्हसाठी विविध फोन व्यवस्था करणे व नवीन गाड्या खरेदीसाठी प्रस्ताव तयार करणे अशा अनेक सुचना सभेत दिल्या गेल्या. तसेच खडकी येथील घनकचरा संकलन केंद्राजवळ सर्व सुविधा असलेले नवीन अग्निशमन कार्यालय सुरू असल्याची माहिती सभापती अग्रवाल यांनी दिली.

सभेत नगरसेवक सिध्दार्थ उपरवट, सामाजिक कार्यकर्ते रणजीत खेडकर, पंकज गावंडे, प्रकाश घोगलिया, मनपा मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष कथले आणि अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.---------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande