ओडिसा: कटक मेडिकल कॉलेजमध्ये भीषण आग, १० रुग्णांचा मृत्यू
भुवनेश्वर, 16 मार्च (हिं.स.)।ओडिसातील कटक येथे सोमवारी पहाटे एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये भीषण आग लागली. या घटनेत आतापर्यंत १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,
ओडिसा: कटक मेडिकल कॉलेजमध्ये भीषण आग, १० रुग्णांचा मृत्यू


भुवनेश्वर, 16 मार्च (हिं.स.)।ओडिसातील कटक येथे सोमवारी पहाटे एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये भीषण आग लागली. या घटनेत आतापर्यंत १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे २.३० ते ३.०० वाजण्याच्या दरम्यान आग लागली.

या प्रकरणाबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर विभागातील आयसीयूमध्ये आग भडकली आणि काही क्षणांतच तिने भीषण रूप धारण केले. येथे अतिशय गंभीर अवस्थेतील रुग्णांवर उपचार सुरू होते. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. अग्निशमन दलाने तत्काळ बचावकार्य राबवत आगीवर नियंत्रण मिळवले.रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्याच्या प्रयत्नात रुग्णालयातील ११ कर्मचारी जखमी झाले. एकूण २३ रुग्णांना घाईघाईने इतर विभाग आणि वॉर्डमध्ये हलवण्यात आले. या बचावकार्यामध्ये रुग्णालय कर्मचारी, पोलीस तसेच रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांनीही सहकार्य केले.

या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि आरोग्यमंत्री मुकेश महालिंग यांनी रुग्णालयाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची भेटही घेतली. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी सांगितले की, आगीचे मुख्य कारण शॉर्ट सर्किट असण्याची शक्यता आहे. ट्रॉमा केअर आयसीयूसह शेजारच्या काही वॉर्डनाही आगीची झळ बसली.

मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी सांगितले की, सात गंभीर रुग्णांचा मृत्यू हलवताना झाला, तर त्यानंतर आणखी तीन रुग्णांनी उपचारादरम्यान प्राण गमावले. जखमी रुग्णांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहू नये, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.राज्य सरकारने प्रत्येक मृताच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. सध्या रुग्णालयातील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असून या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande