
मुंबई, 16 मार्च (हिं.स.) - भारतातील अग्रगण्य फ़ूल-स्टॅक वापरलेल्या गाड्यांचे व्यासपिठ म्हणून स्पिनीला टाईम आणि स्टॅटिस्टिक्सद्वारे भारतातील सर्वात जलद गतीने विकसित होणारी क्रमांक एकची कंपनी म्हणून सम्मानित करण्यात आले. या सन्मानाचा माध्यमाने अशा कंपन्यांना गौरविण्यात येते ज्यांच्याद्वारे एका-पेक्षा अधिक वर्षांचा मूल्यांकन कालावधीमध्ये भक्कम महसूल विकास आणि शाश्वत औद्योगिक प्रगती दर्शविली गेली आहे.
या सन्मानामुळे स्पिनीची ताकद दिसून आली आहे. कारण स्पिनी एक रचनात्मक फ़ूल-स्टॅक मॉडेल असून त्यांनी आपली एक संस्था म्हणून उत्तम कामगिरी तर बजावली आहेच, पण भारतातील वापरलेल्या गाड्यांच्या बाजारपेठेमध्ये एक जबाबदार खेळाडू म्हणून देखील ते पुढे आले आहेत.
गेल्या दशकामध्ये, स्पिनीने पारंपारिकरित्या खंडित आणि रचनात्मक नसलेल्या श्रेणींना औपचारिकता देण्याचे काम केले आहे. गुणवत्ता तपासणी प्रोटोकॉल्स, रचनात्मक नूतनीकरण प्रणाली, पारदर्शक किंमतीची रचना आणि भक्कम असे ग्राहक संरक्षण धोरण या सारख्या गोष्टी सुरू करून कंपनीने विश्वासाकरीता स्पष्ट मानके निर्माण केली आणि गुणवत्तापूर्ण वापरलेल्या गाड्यांचे व्यवहार केले आहेत.
स्पिनी अशा पहिल्या काही कंपन्यांपैकी एक होती, ज्यांनी 200+ विविध मुद्यांवर आधारीत तपास रचना निर्माण केली. त्यासह पाच दिवसांच्या आत पैशाच्या परताव्याची हमी आणि तीन वर्षांची व्यापक वॉरंटी, तसेच सातत्य राखण्याकरीताची धोरणे आणि ग्राहक संरक्षण गुणवत्ता निर्माण केल्या गेल्या. ज्या पुर्वी खूप मर्यादित प्रमाणात होत्या. या असेट हेवी मॉडेलमुळे खरेदी, प्रमाणन, किरकोळ विक्री आणि विक्रीनंतरचे समर्थन एकाच नियंत्रित कक्षात आणून अधिक भक्कम अशी जबाबदारी पार पाडली जाते.
ग्राहकांच्या व्यवहारापलिकडे स्पिनीने सुसंघटित वाहन रिटेल क्षेत्रात देखील योगदान दिले आहे. ज्याकरीता त्यांनी भौतिक अनुभव केंद्र, नूतनीकरण रचना आणि तंत्रज्ञानावर आधारीत किंमतीची माहिती मिळविणे आणि इन्व्हेंटरी व्यवस्थापन प्रणालीमध्ये गुंतवणूक केली आहे. या एकात्मिक दृष्टीकोनामुळे अधिक पारदर्शकता आणि व्हॅल्युचेनचा अंदाज मांडण्यास मदत मिळते.
स्पिनी वर्षाला 2 लाख गाड्यांचा व्यवहार करते. यामध्ये पुरवठा, गुणवत्ता, किंमत आणि ग्राहक अनुभवाचा सखोल अभ्यास केला जातो. सातत्याने प्रणाली सक्षमतेवर लक्ष्य केंद्रित केले जाते, जेणेकरून अनिश्चितता आणि दीर्घकालीन श्रेणी विकासास मदत मिळू शकेल.
स्पिनीला मिळालेली ही क्रमवारी 10 वर्षांचा कार्यकारी मेहनतीचे फ़ळ असून, यामध्ये दशकभरापासून केली गेलेली गुंतवणूक प्रक्रिया , रचना आणि शासकिय फ़्रेमवर्कचा समावेश होतो. ज्यामुळे भारतातील वाहन प्रणाली अधिक रचनात्मक आणि विश्वसनीय झाली आहे.
स्पिनी फ़ूल- स्टॅक क्षमता अधिक मजबूत करण्यास कटीबद्ध आहे आणि भारतातील वापरलेल्या वाहनांचा बाजारपेठेला अधिक सुव्यवस्थित करण्यास देखील प्रयत्न करेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी