बीड ग्रंथोत्सव २७ व २८ मार्चला गेवराईत होणार
बीड, 17 मार्च, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणाअंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या बीड ग्रंथोत्सवासंदर्भातील समन्वय समितीची बैठक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात पार पडली. सहायक हायक ग्रंथालय संचालक (छत्रपती संभाजीनगर) सुनील हुसे यांच्या अ
बीड ग्रंथोत्सव २७ व २८ मार्चला गेवराईत होणार


बीड, 17 मार्च, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणाअंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या बीड ग्रंथोत्सवासंदर्भातील समन्वय समितीची बैठक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात पार पडली. सहायक हायक ग्रंथालय संचालक (छत्रपती संभाजीनगर) सुनील हुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ग्रंथोत्सवाच्या आयोजनासंदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

या बैठकीला जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रियाराणी पाटील, जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रतिनिधी श्रीकृष्ण डोईफोडे, बीड

जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सुधीर चाटे, तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय शा. मस्के उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी संजय मस्के यांनी उपस्थित सदस्यांचे ग्रंथभेट देऊन स्वागत केले. बैठकीत ग्रंथोत्सवाच्या कार्यक्रमांची रूपरेषा तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार बीड ग्रंथोत्सव-२०२५ चे आयोजन २७ व २८ मार्चला गेवराई येथील र.भ. अटल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. बैठकीच्या शेवटी वरिष्ठ लिपिक बा.पा. पठाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande