बीड - एकता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखिका दराडे
बीड, 17 मार्च, (हिं.स.)। आगामी २४ व २५ मार्च रोजी ८ वे एकता मराठी साहित्य संमेलन तालुक्यातील पाडळी येथे मोठ्या उत्साहात संपन्न होत असून या संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका तथा माजी आमदार उषाताई दराडे यांची एकमताने निवड करण्यात आल्याचे एक
बीड - एकता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखिका दराडे


बीड, 17 मार्च, (हिं.स.)। आगामी २४ व २५ मार्च रोजी ८ वे एकता मराठी साहित्य संमेलन तालुक्यातील पाडळी येथे मोठ्या उत्साहात संपन्न होत असून या संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका तथा माजी आमदार उषाताई दराडे यांची एकमताने निवड करण्यात आल्याचे एकता कोअर कमिटीतील पदाधिकाऱ्यांनी कळवले आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीनिमित्त रविवारी पाडळी ग्रामस्थांसोबत एकता फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक सांस्कृतिक सभागृहात संपन्न झाली. त्यामध्ये कोअर कमिटीने घेतलेल्या निर्णयाला ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवत हे संमेलन दर्जेदार पद्धतीने पार पाडण्याचे आश्वासन दिले.

एकता मराठी साहित्य संमेलनाबाबत पाडळीकरांमध्ये प्रचंड उत्साह आणि उत्सुकता दिसून येत असून येत्या रविवारी या दोन दिवसीय एकता मराठी साहित्य संमेलनाची अंतिम रूपरेषा ठरविण्यासाठी आणखी एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती एकता संमेलन समन्वय समितीने दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande