पुणे - शेतकऱ्यांना रास्त दरात शेती औषधे-बियाणे देणार
पुणे, 17 मार्च, (हिं.स.) - शेतकऱ्यांना दर्जेदार शेती साहित्य रास्त दरात उपलब्ध करून देण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान व एआय प्रणालीचा वापर करून शेतीपूरक उपाय देण्याचे काम बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघ करीत आहे. या सुविधांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्
पुणे - शेतकऱ्यांना रास्त दरात शेती औषधे-बियाणे देणार


पुणे, 17 मार्च, (हिं.स.) - शेतकऱ्यांना दर्जेदार शेती साहित्य रास्त दरात उपलब्ध करून देण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान व एआय प्रणालीचा वापर करून शेतीपूरक उपाय देण्याचे काम बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघ करीत आहे. या सुविधांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा,’’ असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या बारामतीच्या शेती औषधे, बियाणे व खतांच्या होलसेल व रिटेल विभागाचे उद्घाटन महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड येथे झाले. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.

शेतकऱ्यांना दर्जेदार शेती साहित्य रास्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी संघाने हा नवीन उपक्रम सुरू केला आहे.गेल्या ६३ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेने शेती औषधे, बियाणे व खते यांचा पुरवठा करताना मार्गदर्शनाची परंपरा जपली आहे. संस्थेची आर्थिक उलाढाल चालू आर्थिक वर्षात फेब्रुवारीअखेरपर्यंत १६० कोटी रुपयांहून अधिक झाली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande