
राजस्थान, 17 मार्च (हिं.स.)। होंडा कार्स इंडिया लिमिटेड (एचसीआयएल) या भारतातील आघाडीच्या प्रिमियम कार्स उत्पादक कंपनी तर्फे त्यांच्या आगामी बॅटरी इलेक्ट्रिक व्हेईकल (बीईव्ही) एसयूव्ही च्या पहिल्या पॅन इंडिया टेस्ट रनला हिरवा झेंडा दाखवला, ज्यायोगे या गाडीची भारतात अधिकृत अशी पब्लिक रोड व्हेरिफिकेशन होणार आहे. होंडाच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा यामुळे पार पडला असून यामुळे भविष्यातील ऑल न्यू इलेक्ट्रिक एसयूव्ही आता भारतीय ग्राहकांसाठी भविष्यात उपलब्ध होण्याचा मार्ग खुला झाला आहे. जपान मोबिलिटी शो २०२५ मध्ये Honda 0 α या नावाने दाखवण्यात आलेल्या मॉडेलचे हे प्रोटोटाईप आहे.
या टेस्टिंग प्रोग्रामच्या माध्यमातून वाहनाची क्षमता ही भारतीय ड्रायव्हिंग कंडिशन्स, जसे हायवेज, शहरातील रस्ते आणि आव्हानात्मक रस्त्यांवर तपासण्यात येणार आहे. यांतील महत्त्वपूर्ण घटक म्हणजे गाडीचा टिकाऊपणा, हँडलिंग, चालवण्यातील आरामदायकपणा, कार्यक्षमता आणि एकूण विश्वसनीयता तपासली जाणार आहे. यावेळी वाहन हे अतिरिक्त उन्हाळी आणि पावसाळी हवामानातून जाणार असून याच बरोबर रोजच्या वापरासाठी सर्व प्रकारच्या चार्जिंग सुविधांचा वापर करुन कार्यक्षमतेची तपासणी यावेळी करण्यात येणार आहे.
यावेळी बोलतांना होंडा कार्स इंडियाचे अध्यक्ष आणि सीईओ ताकाशी नाकाजिमा यांनी सांगितले “ संपूर्ण भारतातील पब्लिक रोड व्हेरिफिकेशन टेस्टिंग ची सुरुवात हा आमच्या इलेक्ट्रिफिकेशनच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. भारतात चालवण्याच्या अनोख्या परिस्थिती आहेत आणि खर्या वातावरणात आमच्या इलेक्ट्रिक वाहनाची तपासणी करणे खूपच गरजेचे आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जागतिक इंजिनियरींगच्या क्षमता स्थानिक जनतेच्या गरजांवर लक्ष्य केंद्रित करुन करतांना आम्ही इलेक्ट्रिक एसयूव्ही प्रथमच विश्वसनीय, आरामदायक आणि वापरण्यास सोपी अशी गाडी उपलब्ध करु शकू.”
आगामी इलेक्ट्रिक एसयूव्ही चा विकास हा शहरी आणि जीवनशैलीवर आधारीत ड्रायव्हिंग सह रोजच्या वापरातील विविध रेंज नुसार करण्यात येत आहे. या मॉडेलची सुरुवात २०२६-२७ या आर्थिक वर्षांत भारत आणि जपान सह अन्य बाजारपेठांमध्ये करण्यात येणार आहे. या वाहनाचे उत्पादन भारतात होणार असून जगभरांत त्यांची निर्यात होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule