
पुणे, 17 मार्च (हिं.स.)पुणे जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या तथाकथित तुटवडीच्या अफवांमुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिक मोठ्या प्रमाणात गॅस एजन्सीसमोर रांगा लावत होते. मात्र, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केलेल्या स्पष्ट आवाहनानंतर आज सकाळपासूनच या रांगा ओसरल्याचे चित्र दिसून येत आहे.जिल्हाधिकारी डुडी यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले की, पुणे जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि त्याचा पुरवठा नियमितपणे सुरू आहे. घरगुती गॅस सिलिंडरची कुठलीही कमतरता नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि रस्त्यावर रांगा लावू नयेत. बुकींग केल्यानंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार,गॅस एजन्सींना रस्त्यावर गर्दी टाळण्याचे आणि नागरिकांना घरपोच वितरणाबाबत समजावून सांगण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु