पुणे - सुट्टीच्या दिवशी निबंधक कार्यालये सुरू राहणार
पुणे, 17 मार्च (हिं.स.)मार्च महिनाअखेर जमीन, सदनिका या मालमत्तांचीखरेदी- विक्रीच्याव्यवहारांची नोंदणी करण्यासाठी होणारी गर्दी पाहता आणि आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानु
पुणे - सुट्टीच्या दिवशी निबंधक कार्यालये सुरू राहणार


पुणे, 17 मार्च (हिं.स.)मार्च महिनाअखेर जमीन, सदनिका या मालमत्तांचीखरेदी- विक्रीच्याव्यवहारांची नोंदणी करण्यासाठी होणारी गर्दी पाहता आणि आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मार्च महिन्यातील दि. २६, दि. २८, दि. २९ आणि दि. ३१ या चार सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही राज्यातील सर्व दुय्यम निबंधक आणि मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालये नियमितपणे सुरू राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी सुट्टीच्या या चार दिवशी कार्यालये सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. केवळ दुय्यम निबंधक कार्यालयेच नव्हे, तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयेही या सुट्ट्यांच्या दिवशी कार्यरत राहतील.

आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने दस्तनोंदणीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते, तसेच पुढील आर्थिक वर्षात रेडी रेकनरच्या दरात वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिक खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ण करण्यास प्राधान्य देतात. सुट्टीच्या दिवशी कार्यालय बंद राहिले, तर इतर दिवशी नागरिकांची दुय्यम निबंधक कार्यालयात मोठी गर्दी होण्याची शक्यता असते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande