
अकोला, 18 मार्च (हिं.स.)।मुंबई येथे आयोजित दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विधीमंडळाचे भाजपा पक्षाचे मुख्य प्रतोद तथा अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर, महापौर शारदा खेडकर, तसेच रणजित खेडकर यांनी भेट घेवून अकोला शहराच्या सर्वांगीण विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा केली.
या भेटीत अकोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रकल्पांवर विचारविनिमय करण्यात आला. विशेषतः रस्ते व पायाभूत सुविधा विकास, पाणीपुरवठा व्यवस्थेचे सुदृढीकरण, स्वच्छता व्यवस्था सुधारणा तसेच नागरिकांना अधिक दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला शहरातील नागरीकांना आवश्यक सुविधा पुरविण्याकरीता निधी अपूरा पडू देणार नाही, तसेच प्रलंबित विकासकामांना गती देणे, नवीन प्रकल्पांना मंजुरी मिळवून देणे व शहराकरिता आवश्यक नाविन्यपुर्ण प्रकल्प उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी सहकार्य करण्याची तसेच भविष्य काळात अकोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार याची ग्वाही दिली.
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीमुळे अकोला शहराच्या विकासाला अधिक वेग मिळणार असून नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास महापौर शारदा खेडकर यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे