साळाव खाडीत थरार! शिडाच्या होड्यांच्या शर्यतीने उसळला उत्साह
रायगड, 18 मार्च (हिं.स.)। शिडाच्या होड्यांच्या शर्यतीने संपूर्ण परिसर दणाणून गेला. आग्राव पूर्वपाडा दर्यासागर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित या पारंपरिक स्पर्धेला यंदा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या मुळे साळाव खाडीत थरार! शिडाच्या होड्यांच्या शर्यतीन
Thrill in Salav Bay! Excitement rises with the Shida boat race


रायगड, 18 मार्च (हिं.स.)।

शिडाच्या होड्यांच्या शर्यतीने संपूर्ण परिसर दणाणून गेला. आग्राव पूर्वपाडा दर्यासागर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित या पारंपरिक स्पर्धेला यंदा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या मुळे साळाव खाडीत थरार! शिडाच्या होड्यांच्या शर्यतीने उसळला उत्साह साजरा झाला.

अलिबाग तालुक्यातील आग्राव येथील साळाव खाडीत गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी रंगलेल्या

खाडीत एकाच वेळी शेकडो होड्या उतरल्याने जणू जल्लोषाचा महासागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. रंगीबेरंगी पताकांनी सजलेल्या होड्या, ढोल-ताशांच्या गजरात नाचणारे कोळी बांधव आणि गाण्यांच्या तालावर बेधुंद झालेला तरुणाईचा उत्साह—यामुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले होते.

रेवदंडा, कोर्लई, बोर्ली, थेरोंडा परिसरातून आलेल्या कोळी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विशेष म्हणजे, शर्यतीदरम्यान वाऱ्याच्या दिशेने वेगाने धावणाऱ्या होड्या आणि परतीच्या फेरीत नाखव्यांचे कौशल्य पाहून प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

या शर्यतीला धार्मिक परंपरेचीही जोड आहे. कार्ला येथील एकविरा मातेच्या नवसातून या स्पर्धेची परंपरा सुरू झाली असून आजही ती तेवढ्याच श्रद्धेने जपली जात आहे. शर्यतीनंतर विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.

दरम्यान, या सोहळ्याला मोठ्या संख्येने पर्यटकांनीही हजेरी लावल्याने साळाव खाडी परिसरात जत्रेचे स्वरूप निर्माण झाले होते. पारंपरिक संस्कृती आणि जल्लोष यांचा संगम घडवणारी ही शर्यत पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande