
मुंबई, 18 मार्च (हिं.स.)। नंदूरबार जिल्ह्यातील नर्मदा बचाव आंदोलनातील सक्रिय कार्यकर्त्याने शासनाकडून आर्थिक मोबदला व पुनर्वसनाचा लाभ घेतला असलेल्या प्रकरणाची पुढील दोन महिन्यात सखोल चौकशी करण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य आमश्या पाडवी यांनी याविषयीसंदर्भात विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती.
राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल म्हणाले की, नर्मदा बचाव आंदोलनातील प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत शासनाने शासन निर्णय ४ फेब्रुवारी २००४ व २० सप्टेंबर २००४ नुसार कार्यवाही केलेली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील गमन येथील हुन्या रूपा वसावे यांच्यासंदर्भात सविस्तर तक्रार दाखल करावी त्याची चौकशी दोन महिन्यात करण्यात येईल असे त्यांनी यावेळी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर