रत्नागिरी : कांचन डिजिटलतर्फे हिंदू नववर्षं शोभयात्रेतून मराठमोळी दुचाकीस्वार निवडणार
रत्नागिरी, 18 मार्च, (हिं. स.) : रत्नागिरीतील प्रसिद्ध कांचन डिजिटल फोटो स्टुडिओतर्फे यंदाच्या हिंदू नववर्ष स्वागतयात्रेतून मराठमोळी दुचाकीस्वार निवडण्यात येणार आहे. ही अनोखी स्पर्धा रत्नागिरीत १९ मार्च रोजी सकाळी ९ वाजता निघणाऱ्या हिंदू नववर्षं श
रत्नागिरी : कांचन डिजिटलतर्फे हिंदू नववर्षं शोभयात्रेतून मराठमोळी दुचाकीस्वार निवडणार


रत्नागिरी, 18 मार्च, (हिं. स.) : रत्नागिरीतील प्रसिद्ध कांचन डिजिटल फोटो स्टुडिओतर्फे यंदाच्या हिंदू नववर्ष स्वागतयात्रेतून मराठमोळी दुचाकीस्वार निवडण्यात येणार आहे. ही अनोखी स्पर्धा रत्नागिरीत १९ मार्च रोजी सकाळी ९ वाजता निघणाऱ्या हिंदू नववर्षं शोभायात्रेत घेण्यात येणार आहे.

या स्वागतयात्रेत हिंदू संस्कृतीशी निगडित, आकर्षक मराठामोळी वेशभूषा करणाऱ्या पाच मराठमोळ्या दुचाकीस्वार महिलांची निवड करण्यात येणार आहे. कांचन डिजिटल फोटो स्टुडिओचे फोटोग्राफर कांचन मालगुंडकर प्रतिवर्षी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेदरम्यान एक आगळीवेगळी संकल्पना घेऊन येतात. यंदा मराठमोळी दुचाकीस्वार ही अशीच अनोखी स्पर्धा त्यांनी आयोजित केली आहे.

शोभयात्रेत मराठमोळी दुचाकीस्वार ही खास महिलांसाठी स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेला महिलांचा उदंड प्रतिसाद लाभेल, असा विश्वास मालगुंडकर यांनी व्यक्त केला आहे.

हिंदू नववर्ष भव्य शोभयात्रेत महिलांनी हिंदू धर्माशी निगडित धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक आकर्षक मराठमोळी वेशभूषा करून सहभागी होणे आवश्यक आहे. तसेच सहभागी स्पर्धकांनी ग्रामदैवत भैरी मंदिर, मारुती मंदिर सर्कल ते पतितपावन मंदिर या दोन्हींपैकी कुठल्याही शोभायात्रेत संपूर्ण सहभागी होणे अत्यावश्यक आहे. या स्पर्धेतून आकर्षक साज ल्यालेल्या पाच मराठमोळी दुचाकीस्वारांचा सन्मान करण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महिलांसाठी वयोगटाची अट नाही. स्पर्धेत महिलांनी आकर्षक मराठमोळी, हिंदू संस्कृतिशी निगडित आकर्षक वेशभूषा परिधान करून बहुसंख्येने सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी 8999332757 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. मालगुंडकर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande