लातूर : गुढी पाडवा व प.पू. डॉ.हेडगेवार यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न
लातूर, 19 मार्च (हिं.स.)।भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई द्वारा संचलित लाल बहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात गुढी पाडवा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक तथा प्रथम सरसंघचालक प.पू.डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम
गुढीपाडवा


लातूर, 19 मार्च (हिं.स.)।भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई द्वारा संचलित लाल बहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात गुढी पाडवा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक तथा प्रथम सरसंघचालक प.पू.डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्वयंसेवक बाळाराम बानापुरे व प्रमुख पाहुणे म्हणून विभाग प्रमुख सुधाकर पोलावार व श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी उपस्थित होते. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक बाळाराम बानापुरे यांनी सर्वप्रथम सर्वांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.त्यांनी प.पू.डॉ.केशव बळीराम हेडगेवार हे एक महान देशभक्त,संघटक आणि समाजसेवक होते.त्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण राष्ट्रसेवेसाठी अर्पण केला.

डॉ.हेडगेवार यांनी १९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.त्यांचा उद्देश एक सशक्त, संघटित आणि संस्कारी समाज निर्माण करणे हा होता.त्यांना विश्वास होता की,जर समाज एकत्र आला,तर देश आपोआप बलवान होईल.डॉ.हेडगेवार यांचे जीवन आपल्याला शिकवते की,देशासाठी कार्य करताना निस्वार्थ भावना आणि समर्पण किती महत्त्वाचे आहे.त्यांनी दाखवून दिले की, छोट्या छोट्या प्रयत्नांतूनही मोठा बदल घडवता येतो.त्यांच्या जीवनातील प्रसंग सांगितले.

अध्यक्षीय समारोपपर भाषणात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी.प.पू.डॉ.हेडगेवार यांचे जीवन आपल्याला निस्वार्थ सेवा, एकता आणि समर्पण यांचे धडे देते. त्यांच्या विचारांचा अंगीकार करून आपण आपले जीवन अधिक अर्थपूर्ण करू शकतो. अनुशासनात राहून आपणही समाजसेवा करण्याचे आवाहन केले.

सुत्रसंचलन सौ.सुनिता कांबळे यांनी केले व सर्व उपस्थितांचे आभार मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande