गुढी पाडव्याच्या निमित्ताने अकोल्यात पारंपारिक रॅली
अकोला, 19 मार्च (हिं.स.)। अकोला शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भगवा फेटा, भगवा झेंडा आणि पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या नागरिकांनी मोटारसायकल रॅली काढत शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. जय श्रीराम आणि
Photo


अकोला, 19 मार्च (हिं.स.)।

अकोला शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भगवा फेटा, भगवा झेंडा आणि पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या नागरिकांनी मोटारसायकल रॅली काढत शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. जय श्रीराम आणि भारत माता की जयच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले.

मराठी नववर्षाच्या निमित्ताने अकोला शहरात भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत हजारो युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हातात भगवे झेंडे, डोक्यावर भगवे फेटे आणि अंगावर पारंपरिक वेशभूषा असा जल्लोष पाहायला मिळाला.

महिला वर्गाने देखील या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नववारी साडी आणि भगव्या वेशात उपस्थिती लावली, ज्यामुळे रॅलीला पारंपरिकतेची जोड मिळाली.

रॅलीमध्ये प्रभू श्रीरामचंद्र आणि भारत माता यांच्या प्रतिमांनी सजवलेले आकर्षक चित्ररथ विशेष लक्षवेधी ठरले.

जय श्रीराम आणि भारत माता की जयच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय आणि देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande