अकोला समाजकल्याण कार्यालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
अकोला, 20 मार्च (हिं.स.)।महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याचा सत्याग्रह शताब्दी वर्ष, तसेच भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सामाजिक न्याय विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समाजकल्याण सहायक आयुक्त ए
अकोला समाजकल्याण कार्यालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन


अकोला, 20 मार्च (हिं.स.)।महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याचा सत्याग्रह शताब्दी वर्ष, तसेच भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सामाजिक न्याय विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समाजकल्याण सहायक आयुक्त एम. जी. वाठ यांनी दिली.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून उपक्रमाचा शुभारंभ झाला. उपक्रमात सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या सर्व शासकीय निवासी शाळा, वसतिगृहे, कार्यालये येथे दि. २० ते २२ मार्चदरम्यान महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह व भारतीय संविधान या विषयावर वक्तृत्व स्पर्धा, व्याख्याने, निबंध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य, लघुनाट्य आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande