नांदेडमध्ये सार्वजनिक सुट्ट्यांवर दुय्यम निबंधक कार्यालये खुली राहणार
नांदेड, 20 मार्च (हिं.स.) । आर्थिक वर्ष संपत येत असल्याने आणि नववर्षानिमित्त नागरिकांमध्ये मालमत्ता खरेदीची कल वाढत असल्यामुळे दस्तनोंदणीचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन दुय्यम निबंधक कार्यालये काही सार्वजनिक सुट्ट्यांवर खुली राहणार आहेत. ग
नांदेडमध्ये सार्वजनिक सुट्ट्यांवर दुय्यम निबंधक कार्यालये खुली राहणार


नांदेड, 20 मार्च (हिं.स.) । आर्थिक वर्ष संपत येत असल्याने आणि नववर्षानिमित्त नागरिकांमध्ये मालमत्ता खरेदीची कल वाढत असल्यामुळे दस्तनोंदणीचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन दुय्यम निबंधक कार्यालये काही सार्वजनिक सुट्ट्यांवर खुली राहणार आहेत.

गुरुवार 26 मार्च, शनिवार 28 मार्च, रविवार 29 मार्च आणि मंगळवार 31 मार्च 2026 या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये कार्यरत राहतील. तसेच, ज्या कार्यालयांची साप्ताहिक सुट्टी शनिवार व रविवार वगळता अन्य दिवशी असते, ती कार्यालय त्यांच्या दोन साप्ताहिक सुट्ट्यांपैकी एक दिवस चालू राहतील.

याप्रसंगी दुय्यम निबंधक कार्यालयांवर नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी तसेच अभिनिर्णय व कमी पडलेले मुद्रांक शुल्क यांसारखे कामकाज वेळेत पूर्ण करता यावे यासाठी सहजिल्हा निबंधक तसेच मुद्रांक जिल्हाधिकारी (मुंबई शहर व उपनगरासह) कार्यालय देखील कार्यरत राहणार आहेत, असे निर्देश नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिले आहेत.

----------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande