महाराष्ट्र सदनात हातमाग वारशावर आधारित फॅशन शो चे आयोजन
नवी दिल्ली, 20 मार्च (हिं.स.) - महाराष्ट्राच्या समृद्ध हातमाग परंपरेला आणि भारताच्या कलात्मक रंगछटांना एकत्र आणणाऱ्या फॅशन शोचे आयोजन उद्या 21 मार्चला सायंकाळी 6.30 वाजता नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र सदन
महाराष्ट्र सदनात हातमाग वारशावर आधारित फॅशन शो चे आयोजन


नवी दिल्ली, 20 मार्च (हिं.स.) - महाराष्ट्राच्या समृद्ध हातमाग परंपरेला आणि भारताच्या कलात्मक रंगछटांना एकत्र आणणाऱ्या फॅशन शोचे आयोजन उद्या 21 मार्चला सायंकाळी 6.30 वाजता नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे आयोजित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र सदन येथे सुरू असलेल्या चार दिवसीय हातमाग साडी प्रदर्शनाअंतर्गत याचे आयोजन करण्यात आले आहे. विकास आयुक्त (हातमाग) आणि महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिखाज् कारागिरी‘ च्या सहकार्याने हा फॅशन शो आयोजित करण्यात आला आहे.

या फॅशन शोमध्ये तीन मुख्य सादरीकरण असतील. सुरुवातीला “ट्रायबल टू मॉडर्न आर्ट –एक भारत श्रेष्ठ भारत” अंतर्गत पिचवाई, पट्टचित्र, वारली, गोंड यांसारख्या भारतीय कलाशैलींनी प्रेरित हस्तचित्रांकित हातमाग साड्यांचे प्रदर्शन होईल. त्यानंतर “प्राईड ऑफ महाराष्ट्र” अंतर्गत अधिकाऱ्यांच्या पत्नी आणि महिला अधिकारी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अभिमानाला रॅम्पवरून व्यक्त करतील. तिसरे: “फ्रॉम द विव्हर्स ऑफ महाराष्ट्र” अंतर्गत महाराष्ट्रातील विविध भागांच्या पैठणी, हिमरू, खण, नारायणपेठी यांसारख्या साड्यांचे सादरीकरण करतील. शेवटी प्रदर्शनातील स्टॉल्समधील विणकर प्रतिनिधींना रॅम्पवर आमंत्रित करून त्यांच्या कौशल्याला मानवंदना करतील. ‘शिखाज् कारागिरी’ ब्रँडच्या हस्तचित्रांकित संग्रहाचे हे विशेष सादरीकरण असून, संकल्पना प्रसिद्ध कलाकार शिखा अजमेरा यांची आहे आणि दिग्दर्शन सेलिब्रिटी फॅशन डिझायनर संदेश नवलखा करत आहेत.

या कार्यक्रमातून विणकर, कारागीर आणि पारंपरिक वस्त्रसंस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येत असून महाराष्ट्राचे धागे आणि भारताचे रंग एकत्र आणून परंपरेला समकालीन स्वरूप देणारा हा उपक्रम आहे.

दिल्लीतील साडीप्रेमी आणि महाराष्ट्र प्रेमींनी या अनोख्या फॅशन अनुभवाला उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी आयुक्त आर विमला यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande